Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

तरुणीची छेडछाड करणारा विकृत अटकेत; १०० हून अधिक सीसीटीव्ही तपासून पोलिसांची कारवाई

पिंपरी | चिंचवडमधील मदर तेरेसा उड्डाणपुलावरील एम्पायर इस्टेट बीआरटी बसथांब्यावर एका २४ वर्षीय तरुणीची छेडछाड केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी अत्यंत तत्परतेने कारवाई करत, तब्बल १०० हून अधिक सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून आरोपी जाखिर हमीद शेख याला वाल्हेकरवाडीतून अटक केली आहे.

ही घटना २२ मे रोजी सकाळी ७:४५ वाजण्याच्या सुमारास घडली. पीडित २४ वर्षीय तरुणी बीआरटी बसथांब्यावर आपल्या कंपनीच्या बसची वाट पाहत उभी होती. यादरम्यान तिथे आलेल्या आरोपी जाखिर शेख याने तिच्यासमोर अश्लील हावभाव करण्यास सुरुवात केली. या प्रसंगाने न डगमगता तरुणीने मोठे धाडस दाखवले आणि आपल्या मोबाईलमध्ये आरोपीचे व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू केले. आपल्याला कॅमेऱ्यात कैद केले जात असल्याचे पाहताच आरोपी घाबरला आणि स्वतःची ओळख लपवण्यासाठी अंगातील जॅकेट व टोपी रस्त्यावरच फेकून तिथून पळून गेला.

हेही वाचा

बकरी ईदसाठी योगी सरकारचे कडक आदेश; रस्त्यांवर नमाज पठण आणि सार्वजनिक ठिकाणी कुर्बानी देण्यास सक्त बंदी

१०० सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे बेड्या

घटनेची गंभीर दखल घेत पिंपरी पोलिसांनी तातडीने तपास चक्र फिरवली. पोलिसांनी घटनास्थळ आणि परिसरातील तब्बल १०० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज बारकाईने तपासले. या तांत्रिक तपासाच्या आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा माग काढला. अखेर वाल्हेकरवाडी परिसरात लपून बसलेल्या जाखिर हमीद शेख याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस या प्रकरणाचा पुढील कायदेशीर तपास करत आहेत. तरुणीने दाखवलेल्या सतर्कतेमुळे आणि धाडसामुळेच या विकृताला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button