पंतप्रधान मोदींनी जॉर्जिया मेलोनी यांना गिफ्ट दिला ‘मेलोडी’ चॉकलेटचा पुडा

Narendra Modi and Meloni | पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या इटलीच्या दौऱ्यावर असून तिथे त्यांचे अत्यंत दिमाखात आणि जंगी स्वागत करण्यात आले आहे. या दौऱ्यात दोन्ही देशांमध्ये महत्त्वपूर्ण द्विपक्षीय चर्चा होणार असली, तरी सध्या सोशल मीडियावर मात्र दोन्ही राष्ट्रप्रमुखांच्या एका वेगळ्याच भेटीची जोरदार चर्चा सुरू आहे. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी पंतप्रधान मोदींसोबतचा एक सेल्फी शेअर केल्यानंतर, आता त्यांचा आणखी एक अनोखा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
या नवीन पोस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांना चक्क ‘मेलोडी’ (Melody) चॉकलेट्सचा पुडा गिफ्ट म्हणून दिल्याचे दिसून येत आहे.
हेही वाचा
१५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचा विश्वविक्रम; टी-२० क्रिकेटमध्ये ‘असा’ कारनामा करणारा जगात पहिलाच!
सोशल मीडियावर ‘मेलोडी’ची चर्चा
यापूर्वी जॉर्जिया मेलोनी यांनी पंतप्रधान मोदींचे स्वागत करतानाचा एक सेल्फी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर केला होता, ज्याला नेटिझन्सनी मोठी पसंती दिली. त्यानंतर मेलोनी यांनी शेअर केलेल्या या दुसऱ्या फोटोने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. सोशल मीडियावर या दोन्ही नेत्यांच्या नावावरून ‘मेलोडी’ (Melodi) हा हॅशटॅग नेहमीच ट्रेंड होत असतो. अशातच पंतप्रधान मोदींनी मेलोनी यांना प्रत्यक्ष ‘मेलोडी’ चॉकलेट्सचा पुडा भेट दिल्याने सोशल मीडिया युजर्समध्ये कमालीची उत्सुकता पाहायला मिळत आहे.
दरम्यान, या दौऱ्यात दोन्ही देशांचे पंतप्रधान भारत आणि इटली यांच्यातील व्यापारी, सांस्कृतिक आणि राजकीय संबंध अधिक मजबूत करण्यासाठी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. मात्र, या अधिकृत चर्चेसोबतच दोन्ही नेत्यांमधील ही मैत्रीपूर्ण केमिस्ट्री सध्या जागतिक पातळीवर आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली आहे.





