ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

सोसायटीधारकांच्या न्याय हक्कांसाठी फेडरेशन कटिबद्ध!

नवनिर्वाचित अध्यक्ष सचिन लोंढे अन्‌ कार्यकारिणीचा संकल्प

सचिवपदी सचिन गुणाले, कोशाध्यक्षपदी प्रदीप घोरपडे यांची निवड

पिंपरी-चिंचवड । प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड सहकारी गृहनिर्माण संस्थांचा महासंघ मर्यादित, वाकड यांच्या नव्याने निवडून आलेल्या व्यवस्थापन समितीची पहिली बैठक उत्साहात पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी विलास लिंबळे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत नवीन पदाधिकाऱ्यांची अधिकृत घोषणा करण्यात आली. महासंघाच्या अध्यक्षपदी सचिन लोंढे, सचिवपदी सचिन गुणाले तर कोशाध्यक्षपदी प्रदीप घोरपडे यांची सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली.

पिंपरी-चिंचवड शहरातील एकमेव नोंदणीकृत सोसायटी फेडरेशन सोसायटीधारकांच्या न्याय हक्कांसाठी महासंघ कटिबद्ध राहील, असा ठाम निर्धार यावेळी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. नागरिकांच्या मूलभूत नागरी प्रश्नांसाठी संघटितपणे लढा देण्यासोबतच सदस्य सोसायट्यांचे प्रश्न प्रशासनापर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यास प्राधान्य दिले जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

यावेळी नंदन इन्स्पेरा सोसाइटीच्या सांस्कृतिक सभागृहात ही बैठक संपन्न झाली. यावेळी सोसायटीचे चेअरमन युवराज हुगे, सचिव अतुल झाडे, खजिनदार नीरज राणे यांनी उपस्थितांना सन्मान केला.

हेही वाचा

पुणे जिल्ह्यात घरसुचीकरण व गृहगणनेला आजपासून सुरुवात

नवनिर्वाचित सदस्यांच्या पहिल्याच बैठकीत सदस्य सोसायट्यांशी अधिक प्रभावी संवाद व्यवस्था उभारण्यावर बैठकीत विशेष भर देण्यात आला. प्रत्येक व्यवस्थापन समिती सदस्याकडे ९ सोसायट्यांची जबाबदारी सोपविण्यात येणार असून नवीन सदस्य सोसायट्या जोडून महासंघाचा विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला.

नागरी प्रश्न सोडविण्यासाठी विभागनिहाय रणनीती तयार करण्यात येणार असून प्रत्येक प्रश्नासाठी विशेष अधिकारी नियुक्त करण्यात येणार आहेत. संबंधित अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार व समन्वयाची जबाबदारी या विशेष अधिकाऱ्यांकडे असेल. विविध विषयांसाठी “स्पेशल पर्पज कमिटी” स्थापन करण्यात येणार असून प्रत्येक समितीत सदस्य सोसायट्यांमधील सहा प्रतिनिधींचा समावेश असणार आहे. फेडरेशनच्या मासिक बैठका नियमित घेण्यात येणार असून प्रत्येक बैठकीचे इतिवृत्त सर्व सदस्य सोसायट्यांना अधिकृत माध्यमातून पाठविण्यात येणार असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.

पिंपरी चिंचवड परिसरातील सोसायटीधारकांच्या न्याय हक्कांसाठी महासंघ ठामपणे उभा राहील. पाणी, रस्ते, सुरक्षा, मालमत्ता कर, बिल्डर संबंधित प्रश्न तसेच विविध नागरी समस्यांबाबत सदस्य सोसायट्यांना सक्षम व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम आम्ही प्राधान्याने करणार आहोत. महासंघ पूर्णपणे अपक्ष आणि पारदर्शक पद्धतीने कार्य करत सर्व सोसायट्यांना एकत्र घेऊन काम करेल.

– सचिन लोंढे, अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड सोसायटी फेडरेशन.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button