ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

दिघीतील उन्हाळी शारीरिक तंदुरुस्ती व कौशल्य विकास शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

क्रीडा विश्व: प्रशिक्षकांच्या विशेष मेहनतीतून खेळाडूंना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण

पिंपरी-चिंचवड | दिघी परिसरातील युवक आणि बालकांमध्ये व्यायामाची आवड, शिस्तबद्ध जीवनशैली आणि क्रीडाप्रेम निर्माण व्हावे या उद्देशाने कार्यक्षम नगरसेवक श्री. उदय दत्तात्रय गायकवाड तथा पुणे जिल्ह्याचे क्रीडा जिल्हाधिकारी श्री. जगन्नाथ लकडे यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या उन्हाळी शारीरिक तंदुरुस्ती व कौशल्य विकास शिबिरास पालक व खेळाडूंकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

दिनांक ५ मे ते १५ मे दरम्यान पार पडलेल्या या शिबिरात मोठ्या संख्येने युवक व बालकांनी सहभाग घेतला. आपल्या मुलांमध्ये व्यायामाची सवय, शिस्त, आत्मविश्वास आणि क्रीडांगणाची ओढ निर्माण व्हावी या सकारात्मक भावनेतून पालकांनीही मुलांना उत्साहाने शिबिरात सहभागी करून घेतले.

हेही वाचा

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पुन्हा आक्रमक! ३० मे पासून अंतरवाली सराटीत आमरण उपोषण

गेल्या अकरा दिवसांमध्ये हे शिबिर अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात आणि शिस्तबद्ध नियोजनातून यशस्वीरित्या पार पडले. संपूर्ण शिबिराचे नियोजन व मार्गदर्शन श्री. अनिल घुले सर यांच्या देखरेखीखाली करण्यात आले. त्यांच्या नेतृत्वाखाली प्रशिक्षकांनी सहभागी खेळाडूंना शारीरिक तंदुरुस्ती, कौशल्य विकास, संघभावना आणि खेळातील शिस्त यांचे प्रभावी प्रशिक्षण दिले. शिबिरासाठी प्रशिक्षक म्हणून श्री. मोहन झुंजे पाटील, श्री. गणेश झगडे, श्री. विनोद वाळके, श्री. प्रमोद भोसले, श्री. अमित गमरे, श्री. राम रजक, श्री. संजय सूर्यवंशी, श्री. प्रल्हाद ठाकूर आणि श्री. अक्षय तापकीर यांनी विशेष परिश्रम घेतले.

यावेळी नवजीवन स्पोर्ट्स फाउंडेशनच्या माध्यमातून भविष्यातही अशा प्रकारचे शिबिर, स्पर्धा आणि विविध क्रीडा उपक्रम सातत्याने आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. नव्या पिढीला सक्षम, सुदृढ आणि क्रीडामय बनविण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन योगदान द्यावे, असे आवाहनही करण्यात आले. दरम्यान, नवजीवन स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने सर्व पालक, खेळाडू, प्रशिक्षक आणि सहकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार व्यक्त करण्यात आले.

आजच्या पिढीला मोबाईल आणि स्क्रीनच्या आहारी न जाता मैदानाशी जोडणे ही काळाची गरज आहे. युवक आणि बालकांमध्ये शिस्त, आत्मविश्वास, संघभावना आणि निरोगी जीवनशैली निर्माण व्हावी यासाठी नवजीवन स्पोर्ट्स फाउंडेशनच्या माध्यमातून भविष्यातही अशाच प्रकारचे शिबिर, स्पर्धा आणि क्रीडा उपक्रम सातत्याने राबविण्यात येतील. प्रत्येक मुलगा-मुलगी खेळाकडे वळून सक्षम आणि सुदृढ नागरिक बनावा, हीच आमची भूमिका आहे.

– उदय गायकवाड, नगरसेवक.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button