Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीउद्योग विश्व । व्यापारताज्या घडामोडी

तुमचं काम फटाफट पूर्ण होणार… ७ कोटी लोकांसाठी आनंदाची बातमी; EPFO मोठा बदल करण्याच्या तयारीत

EPFO Update: देशातील कोट्यवधी नोकरदारांसाठी आनंदाची बातमी आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच Employees’ Provident Fund Organisation (EPFO) आपल्या सेवांमध्ये मोठे बदल करण्याच्या तयारीत आहे. PF काढण्याची प्रक्रिया अधिक वेगवान आणि सोपी करण्यासाठी EPFO आता अंतिम PF सेटलमेंट पूर्णपणे स्वयंचलित करण्याच्या दिशेने काम करत आहे. हा बदल लागू झाल्यास नोकरी सोडल्यानंतर PF चे पैसे खात्यात येण्यासाठी वेळ लागणार नाही

सध्या EPFO कडून ५ लाख रुपयांपर्यंतच्या Advance किंवा Partial Withdrawal Claims चे स्वयंचलित सेटलमेंट केले जाते. या प्रक्रियेत दावा दाखल केल्यानंतर साधारण तीन दिवसांच्या आत पैसे मिळू शकतात. मात्र अंतिम PF सेटलमेंटसाठी अजूनही काही वेळ लागतो आणि अनेकदा कागदपत्रे आणि प्रक्रिया यामुळे विलंब होतो. आता हाच अडथळा दूर करण्यासाठी EPFO मोठा बदल करण्याच्या तयारीत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, EPFO लवकरच अंतिम सेटलमेंटसुद्धा स्वयंचलित करण्याचा विचार करत आहे. म्हणजे कर्मचाऱ्याने नोकरी सोडल्यानंतर त्याच्या PF चा अंतिम हिशोब वेगाने पूर्ण होऊन पैसे थेट बँक खात्यात ट्रान्सफर होऊ शकतात.

हेही वाचा –  टी-20 मध्ये टीम इंडियाचा कॅप्टन बदलाची चर्चा शिगेला पोहोचली असताना आता आयपीएलमध्येही तब्बल तीन कॅप्टनवर टांगती तलवार!

EPFO चे केंद्रीय भविष्य निधी आयुक्त रमेश कृष्णमूर्ती यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, “जिथे शक्य आहे तिथे आम्ही स्वयंचलित सेटलमेंट सुरू करत आहोत. सध्या ही सुविधा Advance Withdrawal साठी उपलब्ध आहे, पण लवकरच अंतिम सेटलमेंट साठीही स्वयंचलित प्रक्रिया लागू करण्याचा प्रयत्न सुरू आहे.”

याशिवाय, नोकरी बदलणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठीही मोठा दिलासा मिळणार आहे. आतापर्यंत कंपनी बदलल्यानंतर PF Account Transfer करण्यासाठी फॉर्म भरावे लागत होते. मात्र आता EPFO नवीन नियोक्त्याकडे PF Account आपोआप Transfer करण्याची व्यवस्था आणण्याच्या तयारीत आहे. म्हणजे कर्मचाऱ्यांना वेगळे फॉर्म भरावे लागणार नाहीत.

EPFO च्या या बदलाचा फायदा देशातील ७ कोटींहून अधिक सदस्यांना होऊ शकतो. विशेष म्हणजे, नव्या लेबर कोडअंतर्गत EPF Scheme 1952, कर्मचारी विमा योजना आणि pension scheme मध्ये काही सुधारणा करून त्या पुन्हा लागू केल्या जाणार असल्याची माहितीही समोर आली आहे.

EPFO कडून अलीकडेच आणखी एक महत्त्वाची अपडेट समोर आली होती. भविष्यात PF पैसे थेट ATM किंवा UPI द्वारे काढण्याची सुविधा सुरू होऊ शकते. काही अहवालांनुसार, मे महिन्याच्या अखेरीपर्यंत ही सुविधा सुरू होण्याची शक्यता आहे. या नवीन EPFO 3.0 system अंतर्गत सदस्यांना ATM कार्डसारखी सुविधा दिली जाऊ शकते, ज्यामुळे कोणतेही कागदपत्रे किंवा कार्यालयात न जाता PF पैसे काढणे शक्य होईल.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button