पुणे RMC असोसिएशनकडून अद्ययावत कामकाजाच्या वेळा जाहीर!
आरएमसी उद्योगात नियोजनबद्ध सेवा व कार्यक्षम पुरवठ्यासाठी नवे वेळापत्रक लागू

पुणे | पुणे- पिंपरी-चिंचवड परिसरातील Pune RMC Association यांनी Ready Mix Concrete (RMC) उद्योगासाठी नवीन आणि अद्ययावत कामकाजाच्या वेळा जाहीर केल्या आहेत. उद्योगातील सेवा अधिक सुरळीत, नियोजित आणि कार्यक्षम पद्धतीने चालाव्यात या उद्देशाने हे बदल करण्यात आले आहेत.
जाहीर केलेल्या माहितीनुसार, आठवड्यातील कामकाजाच्या वेळा दोन वेगवेगळ्या सत्रांमध्ये विभागण्यात आल्या आहेत. सोमवार, मंगळवार, गुरुवार आणि शुक्रवार: या दिवशी सकाळी ११:०० ते सायंकाळी ५:०० या वेळेत कामकाज सुरू राहणार आहे. तसेच, बुधवार, शनिवार आणि रविवार: या दिवशी सकाळी ६:०० ते सायंकाळी ५:०० या वेळेत सेवा उपलब्ध राहील.
हेही वाचा
ताथवडे–पुनावळे अंडरपासची ‘कोंडी’

या निर्णयामुळे बांधकाम क्षेत्रातील RMC पुरवठा अधिक नियोजित पद्धतीने होईल तसेच ग्राहकांना वेळेत सेवा मिळण्यास मदत होईल, असे असोसिएशनकडून स्पष्ट करण्यात आले आहे. उद्योगातील सर्व घटकांना या अधिकृत वेळांचे पालन करण्याचे आवाहनही Pune RMC Association यांनी केले आहे, जेणेकरून संपूर्ण प्रणाली अधिक कार्यक्षम आणि सुरळीतपणे चालू राहील.





