डॉ. सुशांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य पोर्ट्रेट प्रदर्शन
विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; १००० हून अधिक विद्यार्थ्यांनी हातात पोर्ट्रेट धरून दिली मानवंदना

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
Dr. D Y Patil Varale संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुशांत पाटील सर यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांच्या वतीने एक अनोखा आणि प्रेरणादायी उपक्रम आयोजित करण्यात आला. यामध्ये विद्यार्थ्यांनी डॉ. सुशांत पाटील सर आणि ॲड. अनुजा पाटील मॅडम यांचे आकर्षक पोर्ट्रेट तयार करून त्याचे भव्य प्रदर्शन केले.
या कार्यक्रमात सुमारे १००० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेत एकत्रितपणे पोर्ट्रेट हातात धरून मानवंदना दिली. त्यामुळे कार्यक्रमाला भव्य आणि उत्साहपूर्ण वातावरण प्राप्त झाले.
या संपूर्ण उपक्रमाची संकल्पना संपूर्ण शिक्षकवृंद आणि विद्यार्थी यांच्या मार्गदर्शनातून साकार झाली, तसेच संस्थेचे कार्यकारी संचालक श्री. विद्यानंद मानकर सर यांच्या प्रोत्साहनामुळे हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. प्राचार्य डॉ. सुरेश माळी, प्राचार्य डॉ. सुरेश शिरभादुरकर, प्राचार्य डॉ. मेघना भिलारे, प्राचार्य श्री. राजाराम गोलगिरे, CFO रोहन पवार, हेड अकाऊंटंट श्री. संजय भोर, अकॅडेमिक डीन डॉ. योगेश गुरव, रजिस्टार श्री. नामदेव वेताळे, रजिस्टार श्री. प्रदीप खांदवे तसेच डॉ. अल्पना अडसूळ, डॉ. दीपोनिता मंडल, डॉ. अश्विनी चव्हाण, प्रो. योगेश नागवेकर यांनी या अनोख्या उपक्रमाच्या योजनेसाठी मोलाचे योगदान दिले.

हेही वाचा
महापौर रवि लांडगे यांचा स्वगणनेतून जनगणना २०२७ मोहिमेला शुभारंभ
पोर्ट्रेट निर्मितीमध्ये हर्षाली पवार, साक्षी भानुशाली, हेमंत पाटील, अनिशा प्रिया, श्रुती पेंढारे, सुदर्शन गोसावी, चेतन शेलार, सार्थक चव्हाण, प्रवेश दुपारे, सचिन देशमुख,आनंद कोरले, चैत्राली भोसले, चैतन्य तुपे या स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी मोलाचे योगदान दिले. तसेच ३०+ समन्वयकांनीही या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवला.
ही संपूर्ण प्रक्रिया पार पाडण्यासाठी संस्थेचे क्रिएटिव्ह व कल्चरल डायरेक्टर श्री. श्रेयस देशपांडे, मिडिया हेड उन्मेष कोरडे, मंगेश ढोले, प्रो. पंकज धकाते, प्रो. रवी चौरसिया, प्रो. आकाश गायकवाड, स्पोर्ट्स डायरेक्टर किरण माळी, स्पोर्ट्स कॉर्डीनेटर पूनम अभंग, सिद्धू जाधव, स्टूडेंट council हेड प्रो. सागर धनके, योगिता शिंदे यांनी विशेष मेहनत घेतली.
याच प्रसंगी सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे संपूर्ण नियोजन प्रो. संदेश पाटील यांनी केले. या शिबिरात विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवून समाजाप्रती आपली जबाबदारी पार पाडली.
एकूणच, हा कार्यक्रम विद्यार्थ्यांमधील एकता, सामाजिक जाणीव आणि नेतृत्व गुणांचा उत्कृष्ट नमुना ठरला. संस्थेचे संचालक डॉ. सुशांत पाटील आणि ॲड. अनुजा सुशांत पाटील यांनी या अनोख्या भेटीसाठी सर्वांचे मनापासून आभार मानले.





