Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराष्ट्रिय

तुमच्या फोनवरही ‘Emergency Alert’चा मेसेज आला? जाणून घ्या याचा नेमका अर्थ

नवी दिल्ली | देशभरातील अनेक नागरिकांच्या मोबाईलवर अचानक मोठा ‘बीप’ आवाज आणि अनपेक्षित संदेश झळकल्याने काही काळ संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. मात्र, हा कोणताही धोका नसून केंद्र सरकारकडून नव्या ‘आपत्कालीन अलर्ट’ प्रणालीची चाचणी सुरू असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या प्रणालीद्वारे निवडक भागातील सर्व मोबाईल फोनवर थेट चेतावणी संदेश पाठवले जात आहेत. दूरसंचार विभाग (DoT) आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (NDMA) यांच्या संयुक्त विद्यमाने ही मोहीम राबवली जात असून, तिला ‘सेल ब्रॉडकास्ट’ असे नाव देण्यात आले आहे. अनेक विकसित देशांमध्ये अशा प्रकारची प्रणाली आधीपासून वापरात आहे.

‘सेल ब्रॉडकास्ट’ म्हणजे काय?

ही प्रणाली ‘सचेत’ (SACHET) नावाच्या अलर्ट प्लॅटफॉर्मशी जोडलेली आहे. ‘सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलिमॅटिक्स’ (C-DOT) यांनी स्वदेशी तंत्रज्ञानाच्या आधारे ही प्रणाली विकसित केली आहे. या माध्यमातून एका ठराविक भौगोलिक क्षेत्रातील सर्व मोबाईल फोनवर एकाच वेळी संदेश पाठवता येतात. त्यामुळे टेलिकॉम नेटवर्कवर ताण न पडता माहिती जलदगतीने पोहोचवणे शक्य होते. त्सुनामी, भूकंप, वीज पडणे, गॅस गळती किंवा रासायनिक आपत्ती यांसारख्या संकटांच्या वेळी, जेव्हा फोन लाईन्स आणि डेटा नेटवर्क व्यस्त असतात, तेव्हा ही प्रणाली अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

हेही वाचा

राज्यात बारावीचा निकाल जाहीर; एकूण निकाल ८९.७९ टक्के

नेमका कोणता संदेश पाठवला जात आहे?

सरकारकडून पाठवण्यात आलेल्या चाचणी संदेशात, “भारताने आपल्या नागरिकांसाठी तात्काळ आपत्ती सूचना सेवेकरिता स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून सेल ब्रॉडकास्ट सुरू केले आहे. हा एक चाचणी संदेश आहे. नागरिकांनी कोणतीही कृती करण्याची आवश्यकता नाही,” असे नमूद करण्यात आले आहे.

सध्या देशभर या प्रणालीची कार्यक्षमता आणि विश्वासार्हता तपासण्यासाठी चाचण्या सुरू आहेत. या काळात नागरिकांना इंग्रजी, हिंदी तसेच प्रादेशिक भाषांमध्ये असे चाचणी संदेश एकापेक्षा जास्त वेळा मिळू शकतात, जे पूर्णपणे सामान्य असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.

सेटिंग कशी बदलावी?

ज्यांच्या मोबाईलमध्ये ‘सेल ब्रॉडकास्ट टेस्ट अलर्ट’ सुरू (Enable) आहे, त्यांनाच हे संदेश मिळतात. वापरकर्ते त्यांच्या फोनच्या Settings > Safety and Emergency > Wireless Emergency Alerts > Test Alerts या पर्यायांमध्ये जाऊन हे सेटिंग आवश्यकतेनुसार बदलू शकतात.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button