जेसन होल्डरचा वादग्रस्त कॅच.. विराटचा दंगा; रजत पाटीदार आऊट होता की नव्हता; नियम काय सांगतो?

Jason Holder catch controversy: गुजरात टायटन्स विरूद्ध रॉयल चॅलेंजर बंगळुरू यांच्यातील सामन्यात गुजरातच्या जेसन होल्डरने आरसीबी कर्णधार रजत पाटीदारचा कॅच पकडला. मात्र अहमदाबादमध्ये झालेल्या या सामन्यातील हा वादाचा एक क्षण ठरला. होल्डने झेल घेताना चेंडू जमिनीवर घासला का असा प्रश्न उपस्थित होत आहे. विराट कोहलीने देखील याबाबत मैदानाबाहेरील तिसऱ्या पंचांशी हुज्जत घातल्याचे दिसत आहे. हा वाद पहिल्या डावाच्या आठव्या षटकात घडला.
आठवे षटक टाकणाऱ्या अर्शद खानचा एक चेंडू पाटीदारनने पूल केला. मात्र टॉप एज लागल्याने चेंडू हवेत उंच गेला. हा झेल पकडण्यासाठी होल्डर आणि रबाडा दोघेही पुढे सरसावले. ऐनवेळी रबाडाने माघार घेतली तर जेसन होल्डरने डाईव्ह मारत झेल टिपला. मात्र डाव्या हाताने झेल टिपल्यानंतर चेंडू जमिनीला लागल्याचे व्हिडिओत दिसत होते.
हेही वाचा – ‘या’ 5 चटपटीत मसालेदार पेयांनी उष्णतेवर होईल मात आणि शरीर राहील हायड्रेटेड
पाटीदार बाद झाल्यानंतर पॅव्हेलियनकडे चालत जात होता. तिसऱ्या पंचांनी देखील रिव्ह्यूमध्ये त्याला बाद ठरवलं होतं. मात्र ज्यावेळी त्याने कॅचचा व्हिडिओ पाहिला त्यावेळी पाटीदार सीमारेषेजवळ थांबला. आरसीबी कर्णधार निर्णयावर खुश नव्हता. विराट तर मैदानात जाऊन वाद घालण्यासाठी तयारच होता. तो आणि मुख्य कोच अँडी फ्लॉवर हे पंचांची हुज्जत घालत होते.
एमसीसी नियमानुसार जरी चेंडू मैदानावर स्पर्श करत असला तरी झेल हा क्लीन होता. होल्डरने घेतलेला कॅच हा वैध होता की नव्हता हे ठरवताना पंचांनी ज्यावेळी होल्डरने झेल पकडला त्यावेळी चेंडू जमिनीला स्पर्श करत होता की नाही हे पाहिले. त्यावेळी चेंडू जमिनीला स्पर्श करत नव्हता. होल्डरने कॅच क्लीन पकडला होता. त्यावेळी तोपूर्णपणे नियंत्रणात होता. नंतर चेंडू मैदानावर घासला गेला.
एमसीसी रूल बुकमधील नियम ३३ (३३.२.२.१) स्पष्टपणे सांगतो की, ‘चेंडू फिल्डरने हाताने किंवा हातांनी क्लीन पकडला असेल आणि जरी बॉल पकडलेला हात मैदानाला लागला किंवा शरीराच्या भागात, फिल्डरने घातलेल्या सुरक्षेसाठीच्या वस्तू किंवा कपड्यात अडकला तरी तो क्लीक कॅच पकडला जाईल.
तिसरे पंच अभिजित भट्टाचार्य यांना वाटलं की ज्यावेळी होल्डने झेल पकडला त्यावेळी तो पूर्णपणे नियंत्रणात होता. त्यानंतर तो चेंडू मैदानावर घासला त्यामुळं पाटीदारला बाद ठरवण्यात आलं. अनेक खेळाडू प्रशिक्षकांना या नियमाची कल्पना नव्हती. त्यांच्या मते चेंडूचा मैदानावर स्पर्श झाला की फलंदाज नाबाद असतो. काही अंशी हे सत्य आहे. मात्र या प्रकरणात हे मत चुकीचे असू शकते.





