Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

आपला मोठा धक्का! राघव चड्ढा यांच्यासह 7 खासदारांचा भाजपात जाण्याचा निर्णय

Raghav Chadha | देशाच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवणारी घटना समोर आली असून आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांनी पक्षाला रामराम ठोकत भाजपसोबत जाणार असल्याची घोषणा केली आहे. त्यांच्या या निर्णयामुळे अरविंद केजरीवाल यांना मोठा राजकीय धक्का बसल्याचे मानले जात आहे.

राघव चड्ढा यांनी आज संदीप पाठक आणि अशोक मित्तल यांच्यासह पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी सांगितले की, राज्यसभेतील आम आदमी पक्षाच्या दोन-तृतीयांश सदस्यांनी घटनात्मक तरतुदीनुसार भाजपमध्ये विलीन होण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी त्यांनी पक्षावर आपल्या मूळ मूल्यांपासून भरकटल्याचा आरोप केला. चड्ढा म्हणाले की, ज्या पक्षासाठी मी १५ वर्षे मेहनत घेतली, तो आता आपल्या मूलभूत तत्त्वांपासून दूर गेला आहे. हा पक्ष देशहिताऐवजी वैयक्तिक फायद्यासाठी काम करत आहे.

हेही वाचा   

इस्रायल-लेबनॉन युद्धविराम तीन आठवड्यांनी वाढवला; ट्रम्प यांची घोषणा 

चड्ढा पुढे म्हणाले, राज्यसभेत ‘आप’चे १० खासदार आहेत आणि त्यापैकी दोन-तृतीयांशहून अधिक खासदार या बाबतीत आमच्यासोबत आहेत. त्यांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत आणि आज सकाळीच आम्ही ते स्वाक्षरी केलेले पत्र व संबंधित कागदपत्रे राज्यसभेच्या सभापतींकडे सादर केली आहेत. मी चुकीच्या पक्षात असल्याची जाणीव गेल्या काही वर्षांत होत होती. त्यामुळे आज मी पक्षापासून दूर होत असून जनतेच्या जवळ जात आहे. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाहांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत, आम्ही आमचा राजकीय प्रवास पुढे नेताना देशासाठी काम करू, असेही सांगितले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button