Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याहस्ते कराड तालुक्यात शैक्षणिक प्रकल्पांचे लोकार्पण व भूमिपूजन

सातारा : कराड तालुक्यातील शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी शासन कटिबद्ध असून, ग्रामीण व शहरी भागातील शाळांचा कायापालट करण्यात येत आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.

कराड तालुक्यातील वस्ती साकुर्डी येथील जिल्हा परिषद शाळेच्या नूतन खोल्यांचे लोकार्पण आणि कराड पीएम श्री कराड नगरपरिषद शाळा क्र. ३ च्या नवीन इमारतीचे भूमिपूजन पालकमंत्री देसाई यांच्याहस्ते पार पडले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कराड येथील झालेल्या कार्यक्रमास कराडचे नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव, माजी आमदार बाळासाहेब पाटील, उपनगराध्यक्ष प्रशांत साळुंखे, कराड नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर, यांच्यासह नगरसेवक विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

जिल्हा परिषदेच्या शाळेमधून विद्यार्थ्यांना गुणवत्ता पूर्ण शिक्षण मिळावे यासाठी माझी शाळा आदर्श शाळा या उपक्रमांतर्गत जिल्हा वार्षिक योजनेतून शंभर कोटींचा निधी दिला आहे. तसेच स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र योजनेलाही 153 कोटीचा निधीही देण्यात आलेला आहे.

हेही वाचा –  आगामी सार्वत्रिक व पोटनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर माध्यम प्रतिनिधींसाठी नियमावली जाहीर

विद्यार्थी हा उद्याच्या भारताचा आधारस्तंभ आहे. त्यांना दर्जेदार भौतिक सुविधा उपलब्ध करून देणे ही आमची प्राथमिकता आहे.  गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. नगर परिषद शाळा क्रमांक 3 मध्ये नववी व दहावीचे वर्ग सुरू करण्याचा प्रस्ताव तातडीने शासनाला सादर करावा तो प्रस्ताव मंजूर करून घेऊ अशी ग्वाही पालकमंत्री देसाई यांनी दिली.

कराड नगराध्यक्ष यादव म्हणाले, शाळा क्रमांक तीनची इमारतीमध्ये विद्यार्थ्यांना गुणवत्ता व दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या शाळेतून भविष्यात गुणवंत विद्यार्थी घडतील व वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

साकुर्डे येथे झालेल्या कार्यक्रमात प्रसंगी पालकमंत्री देसाई म्हणाले, साकुर्डी येथील शाळा या आदर्श शाळा आहे ग्रामस्थांनी लक्ष घातल्यानंतर अशी आदर्श शाळा निर्माण होते. या शाळेविषयी मांडण्यात आलेल्या विविध प्रश्न सोडवण्यात येतील. तसेच या भागातील विकास कामांना निधीची कमतरता पडून येणार नाही अशी ग्वाही पालकमंत्री देसाई यांनी दिली.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button