ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

दिघी येथे १३५ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सामाजिक बांधिलकीतून उपक्रम

पिंपरी-चिंचवड | भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीचे औचित्य साधून दिघी गावात गरजू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटपाचा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला.

माजी नगरसेवक विकास हरिश्चंद्र डोळस व नगरसेविका श्रुती विकास डोळस यांच्या मार्गदर्शनाखाली संघर्ष स्पोर्ट्स क्लब आणि कपिलवस्तू बुद्ध विहार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने एकूण १३५ विद्यार्थ्यांना शैक्षणिक किटचे वितरण करण्यात आले. या किटमध्ये स्कूल बॅग, सहा वह्यांचा संच, कंपास बॉक्स आणि पेन आदी शैक्षणिक साहित्याचा समावेश होता.

हेही वाचा       :                ‘राजा शिवाजी’ चित्रपटाचे पिंपरी-चिंचवडमध्ये दणक्यात ‘प्रमोशन’

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” या संदेशाला अनुसरून हा उपक्रम सामाजिक बांधिलकीतून राबविण्यात आला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला चालना मिळावी, तसेच त्यांच्या शिक्षण प्रवासात कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, हा या उपक्रमामागील उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.

या वेळी बोलताना माजी नगरसेवक विकास डोळस यांनी, “डॉ. आंबेडकरांनी शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साधने देणे हीच खरी मानवंदना आहे,” असे मत व्यक्त केले.

या कार्यक्रमास नगरसेविका श्रुती डोळस, संघर्ष स्पोर्ट्स क्लबचे पदाधिकारी, कपिलवस्तू बुद्ध विहार समितीचे सदस्य तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. शैक्षणिक साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. या उपक्रमाचे दिघी परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखवलेल्या शिक्षणाच्या मार्गावर प्रत्येक गरजू विद्यार्थ्याने आत्मविश्वासाने पुढे जावे, यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील राहू. शिक्षण हीच खरी प्रगतीची गुरुकिल्ली आहे आणि कोणताही विद्यार्थी त्यापासून वंचित राहू नये, हीच आमची बांधिलकी आहे.

– विकास डोळस, माजी नगरसेवक, भाजपा.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button