ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

नामदार शिवेंद्रराजेंकडून जावळीला झुकते माप!

जिल्हा परिषदेच्या विविध विषय समित्यांमध्ये वसंतराव मानकुमरे, सैारभबाबा शिंदे व जयश्री गिरींसह तिघांना संधी - सैारभ शिंदेंना डबल लाँटरी

कुडाळ : सातारा जिल्हा परिषदेतील विषय समित्यांच्या सदस्यांची आज निवड करण्यात आली असून, इतिहासात पहिल्यांदाच जावळी तालुक्यातील तीन पदाधिकाऱ्यांना विविध समित्यांमध्ये काम करण्याची मोठी संधी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या सहकार्याने मिळाली आहे. नामदार शिवेंद्रराजे यांनी जावळी तालुक्याला झुकते माप देताना म्हसवे गटातून निवडून आलेले वसंतराव मानकुमरे यांची स्थायी समितीवर, तर जावली पंचायत समितीचे नुतन सभापती सौरभबाबा शिंदे यांची बांधकाम समितीवर व कुडाळ गटातून निवडून आलेल्या सदस्या जयश्री गिरी यांची महिला बालकल्याण व आरोग्य समितीवर निवडी करून जावली तालुक्याचा एक प्रकारे सन्मानच केला आहे. विविध समित्यांमध्ये जावली तालुक्यातील तीन पदाधिकाऱ्यांना संधी मिळाल्याने तालुक्यातील जनतेमध्ये कमालीचा उत्साह निर्णाण झाला असून या निवडीमुळे तालुक्याच्या विकासाला आणखीण बळ मिळणार असल्याची भावना जनतेमधून व्यक्त होऊ लागली आहे. जिल्हा परिषदांच्या स्थायी समिती आणि इतर विषय समित्यांच्या सदस्य निवडीसाठी जिल्हायतील विविध पदाधिकाऱ्यांनी स्थानिक नेतृत्वाकडे जोरदार लॉबिंग करून मागणी केली होती,

सातारा जिल्हा परिषदेत १७ एप्रिल २०२६ रोजी स्थायी समितीसह विविध समित्यांची निवड प्रक्रिया पार पडल्या. ६५ सदस्य संख्या असलेल्या या जिल्हा परिषदेत सभापती निवडीत भाजपने बाजी मारून सर्व सत्तास्थाने आपल्या ताब्यात ठेवली आहेत.जिल्हा परिषद अध्यक्षा डाँ.प्रिया शिंदे यांनी शुक्रवारी विशेष सर्वसाधारण सभेत सहा विषय समित्यांच्या सभापतीपदांचे वाटप जाहीर केले.या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह सर्व विभागप्रमुख व सदस्य उपस्थित होते. जावली तालुक्यात तीघांना विविध समित्यांवर काम करण्याची संधी दिल्यामुळे जावली तालुका भाजपचे अध्यक्ष संदिप परामणे यांनी नामदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यासह जिल्हा परषद अध्यक्ष, उपाध्यक्ष यांचे आभार मानले.

हेही वाचा –  पिंपरीसाठी नवीन इलेक्ट्रिकल सबस्टेशनची मागणी

सैारभ शिंदे यांना दुहेरी संधी

कुडाळ पंचायत समिती गणातून निवडून आलेले सैारभ शिंदे यांची जावली पंचायत समितीच्या सभापतीपदी नुकतीच निवड झाली होती, आज झालेल्या जिल्हा परिषदेच्या विविध समित्यांची निवड प्रक्रियेत सुध्दा त्यांना बांधकाम समितीवर काम करण्याची संधी मिळाल्याने त्यांना राजकीय क्षेत्रात अत्यंत कमी वयात दोन्ही मोठ्या चांगल्या पदांवर काम करण्याची संधी मिळाली असल्याने दुहेरी संधी प्राप्त झाली आहे, त्यांच्या या निवडीमुळे माजी आमदार स्वर्गीय लालसिंगराव शिंदे यांच्या राजकीय घराण्याचा व कुडाळ गावचा योग्य सन्मान झाला असल्याचे बोलले जात आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button