ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

पिंपरीसाठी नवीन इलेक्ट्रिकल सबस्टेशनची मागणी

आमदार अमित गोरखे: वीज समस्यांवर तोडगा काढण्याचा प्रयत्न

पिंपरी-चिंचवड : पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील वाढत्या वीज वितरण समस्यांवर तोडगा काढण्यासाठी आयोजित बैठकीत पिंपरीसाठी नवीन इलेक्ट्रिकल सबस्टेशन उभारण्याची मागणी आमदार अमित गोरखे यांनी केली. ही बैठक राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील प्रकाश भवन येथे पार पडली.

पिंपरी शहरातील संभाजीनगर, काळभोरनगर, विद्यानगर, दत्तनगर, इंदिरानगर, शंकरनगर, मोरवाडी, आकुर्डी, प्राधिकरण, पिंपरी गाव, दापोडी, संत तुकाराम नगर आदी भागांमध्ये वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. सध्या या भागांना टाटा टेल्को उपकेंद्रामार्फत वीजपुरवठा केला जात असून त्याच उपकेंद्रावरून चाकण, आनंदी, जाधववाडी व चिखलीसारख्या दूरच्या भागांनाही वीजपुरवठा होत असल्याने त्यावर अतिरिक्त ताण निर्माण झाला आहे.

या पार्श्वभूमीवर पिंपरी शहरासाठी स्वतंत्र इलेक्ट्रिकल सबस्टेशन उभारणे अत्यावश्यक असल्याचे आमदार गोरखे यांनी बैठकीत स्पष्ट केले. यामुळे वीजपुरवठा सुरळीत होऊन नागरिकांना होणारा त्रास कमी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

हेही वाचा –  रावेत, काळेवाडी, बिजलीनगरसह हिंजवडीमध्ये चार नवीन महावितरण कार्यालयांची निर्मिती: आमदार शंकर जगताप

यावेळी आमदार गोरखे यांनी वीज वितरण सुधारण्यासाठी काही महत्त्वाच्या मागण्या मांडल्या. यात अतिरिक्त वीज भार असलेल्या रोहित्रांची क्षमता वाढविणे, ट्रान्सफॉर्मर्सना सुरक्षिततेसाठी एफआरपी फेन्सिंग करणे, जुने व कमकुवत एलटी व एचटी केबल्स बदलणे, खराब झालेल्या फीडर पिलर्सचे नूतनीकरण, उपरी वीजवाहिन्या भूमिगत करणे तसेच अपघाती ठिकाणी असलेल्या ट्रान्सफॉर्मर्सचे स्थलांतर करणे यांचा समावेश आहे.

शहरातील वाढत्या लोकसंख्येमुळे आणि औद्योगिक विस्तारामुळे वीजेची मागणी वाढत असून विद्यमान यंत्रणेवर ताण येत आहे. वारंवार होणारे वीज खंडित होणे ही गंभीर समस्या बनली असून यावर कायमस्वरूपी उपाय म्हणून नवीन सबस्टेशन उभारणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

या बैठकीत संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. नागरिकांना अखंडित वीजपुरवठा देण्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्याबाबत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती देण्यात आली.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

“पिंपरी शहरात वाढत्या लोकसंख्येमुळे आणि औद्योगिक विस्तारामुळे वीजेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या उपकेंद्रावर प्रचंड ताण असल्याने नागरिकांना वारंवार वीज खंडित होण्याचा त्रास सहन करावा लागत आहे. या समस्येवर कायमस्वरूपी आणि प्रभावी तोडगा म्हणून पिंपरीसाठी स्वतंत्र नवीन इलेक्ट्रिकल सबस्टेशन उभारणे अत्यावश्यक आहे. तसेच वीज वितरण यंत्रणेतील इतर तांत्रिक सुधारणाही तातडीने करण्यात याव्यात, जेणेकरून नागरिकांना अखंडित व सुरक्षित वीजपुरवठा मिळू शकेल.”

– अमित गोरखे, आमदार, विधान परिषद.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button