ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपळे सौदागरच्या शिरपेचात मानाचा तुरा! कु. रुग्वेद शेवाळेची ‘सैनिक शाळे’कडे झेप

भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांच्या हस्ते झाला यथोचित गौरव

पिंपरी | जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर पिंपळे सौदागरमधील ‘साई वैभव’ (सेव्हन स्टार लेन) येथील अवघ्या एका बालकाने यशाचे उत्तुंग शिखर सर केले आहे. कु. रुग्वेद शशिकांत शेवाळे याने अत्यंत कठीण समजली जाणारी ‘सैनिक शाळा प्रवेश परीक्षा २०२६’ पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण होऊन अमरावतीनगर (तामिळनाडू) येथील सैनिक शाळेत आपले स्थान निश्चित केले आहे. रुग्वेदच्या या गौरवशाली यशाबद्दल भाजप शहराध्यक्ष व नगरसेवक शत्रुघ्न (बापू) काटे यांच्या हस्ते त्याला सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

अथक परिश्रमातून ‘तिहेरी’ यशाची मोहोर…

देशभरातून जवळपास २ लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. त्यामधून रुग्वेदने केवळ लेखी परीक्षाच नव्हे, तर अत्यंत कठीण समजली जाणारी वैद्यकीय चाचणीही यशस्वीरीत्या पार केली. विशेष म्हणजे, त्याने केवळ सैनिक शाळाच नाही, तर जवाहर नवोदय विद्यालय आणि राष्ट्रीय मिलिटरी स्कूल या दोन्ही प्रतिष्ठित शाळांच्या प्रवेशासाठीही पात्रता सिद्ध करत यशाची ‘हॅट्ट्रिक’ साधली आहे.

हेही वाचा     :                महापालिकेतील चुकीच्या कामांवर अंकूश हीच भाजपाची कार्यप्रणाली!

शत्रुघ्न (​बापू) काटे यांनी थोपटली पाठीवर कौतुकाची थाप:-

या प्रसंगी शत्रुघ्न काटे म्हणाले की, “आजच्या पिढीतील मुलांनी देशसेवेचे स्वप्न उराशी बाळगून अशा स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यश मिळवणे, ही संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहरासाठी अभिमानाची गोष्ट आहे. रुग्वेदने केवळ शेवाळे परिवाराचेच नव्हे, तर आपल्या परिसराचे नाव राष्ट्रीय पातळीवर पोहोचवले आहे. त्याच्या या यशात त्याच्या पालकांचे आणि शिक्षकांचे मोठे योगदान आहे. भविष्यात रुग्वेद एक उत्तम लष्करी अधिकारी बनून देशाची सेवा करेल, असा मला विश्वास आहे.”

​यावेळी शशिकांत शेवाळे व शेवाळे परिवार तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते. रुग्वेदच्या या तिहेरी यशाचे सर्वत्र कौतुक होत असून, त्याने आपल्या कतृत्वाने इतर विद्यार्थ्यांसमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button