Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भोसरी स्पाईन रोडवर उघडपणे अनैतिक प्रकार!

सोसायटी फेडरेशनचा आक्रमक पवित्रा: पोलीस प्रशासन झोपेत, नागरिक संतप्त

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी

शहरातील भोसरी स्पाईन रोड परिसरात, टाटा मोटर्स कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर आणि आजूबाजूच्या भागात रात्रीच्या वेळी उघडपणे सुरू असलेल्या संशयित अनैतिक प्रकारांमुळे नागरिक संतप्त झाले आहेत. कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी असलेल्या यंत्रणेच्या निष्क्रियतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, दररोज रात्री काही महिला रस्त्यावर उभे राहून येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना उघडपणे हातवारे करून आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात. हा प्रकार इतक्या उघडपणे आणि बिनधास्त सुरू आहे की, या मार्गाने जाणाऱ्या महिला, कुटुंबे आणि लहान मुलांनाही मोठ्या अस्वस्थतेचा सामना करावा लागत आहे. “रात्री या रस्त्यावरून जाणे म्हणजे धाडसच,” अशी तीव्र प्रतिक्रिया काही नागरिकांनी व्यक्त केली.

हेही वाचा      :            अवकाळीने झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना १२८ कोटी ६५ लाखांची मदत

या गंभीर प्रकाराबाबत चिखली-मोशी पिंपरी-चिंचवड हाउसिंग सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे यांनी थेट पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. तसेच चिखली पोलीस स्टेशन यांनाही याची माहिती देण्यात आली आहे.

नागरिकांचा रोष यासाठी अधिक वाढला आहे की, इतका उघडपणे सुरू असलेला प्रकार असूनही पोलीस यंत्रणा अद्याप प्रभावी कारवाई करण्यात अपयशी ठरली आहे. त्यामुळे “पोलीस प्रशासन नेमके काय करत आहे?” असा थेट सवाल उपस्थित केला जात आहे.

परिसरात निर्माण झालेली ही परिस्थिती केवळ कायद्याचा भंग नसून एक गंभीर सामाजिक प्रश्न बनत चालली आहे. जर तात्काळ आणि कठोर कारवाई झाली नाही, तर नागरिकांना रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

“भोसरी स्पाईन रोडवरील टाटा मोटर्स समोरील परिसरात रात्रीच्या वेळी सुरू असलेले हे प्रकार अत्यंत गंभीर आणि चिंताजनक आहेत. महिला भगिनी, कुटुंबे आणि लहान मुलांना या रस्त्यावरून सुरक्षितपणे ये-जा करणे कठीण झाले आहे. वारंवार तक्रारी करूनही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. पोलीस प्रशासनाने तात्काळ कठोर पावले उचलून हा प्रकार पूर्णपणे बंद करावा, अन्यथा आम्हाला नागरिकांसह तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल.”

– संजीवन सांगळे, अध्यक्ष, चिखली मोशी-पिंपरी-चिंचवड हाउसिंग सोसायटी फेडरेशन.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button