Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीउद्योग विश्व । व्यापार

तेरा वर्षांनी रुपया चमकला; डॉलर घसरला!

मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेने कडक पावले उचलल्यामुळे रुपयाचे मूल्य डॉलरच्या तुलनेत सुधारले असून, गुरुवारच्या सत्रात एका डॉलरचा भाव 92.83 झाला. ही रुपयाची गेल्या 13 वर्षांतील सर्वोत्तम कामगिरी आहे.

रिझर्व्ह बँकेने सर्वच बँकांना कोणत्याही ग्राहकांना रुपया नॉन-डिलिव्हरेबल फॉरवर्डस् देऊ करण्यावर बंदी घातली आणि रद्द झालेल्या फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्टस्च्या रिबुकिंगवरही बंदी घातली. विश्लेषकांच्या मते, गेल्या दशकातील ही सर्वात कठोर उपाययोजना आहे. परिणामी, गुरुवारच्या सत्रात एका डॉलरचा भाव 92.83 रुपये एवढा खाली आला. बाजार बंद होताना एका डॉलरचा भाव 93.10 रुपयांवर बंद झाला. एका दिवसात रुपया 171 पैशांनी वधारला. ‘आरबीआय’च्या हस्तक्षेपामुळे का असेना, रुपयाची ही गत 13 वर्षांतील सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. मागील सत्रात एका डॉलरच्या तुलनेत रुपया नीचांकी 95.21 पातळीवर गेला होता.

हेही वाचा –  ‘छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियानातून विश्वासनिर्मिती व्हावी’; मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

गुरुवारी सकाळच्या सत्रात सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांकांत तीन अंकांनी पडझड झाली. दुपारच्या सत्रात बँकिंग, आयटी, फायनान्स क्षेत्रातील बलाढ्य कंपन्यांमधील गुंतवणूक वाढल्याने सेन्सेक्स दिवसभराच्या नीचांकावरून 185 आणि निफ्टी 33 अंकांनी वाढला. सेन्सेक्स 0.25 टक्क्याच्या वाढीसह 73,319 अंकांवर विसावला.

सोने, चांदी स्वस्त : जळगावच्या सुवर्ण बाजारपेठेत गुरुवारी सोन्यात 4,738 रुपयांची घट नोंदवली गेली. त्यामुळे सोन्याचे दर जीएसटीसह प्रति 10 ग्रॅम एक लाख 51 हजार 204 रुपयांपर्यंत घसरले. चांदीच्या दरात 12,360 रुपयांची घट झाल्याने जीएसटीसह प्रतिकिलो दोन लाख 41 हजार 20 रुपयांपर्यंत भाव घसरले.

इंधन पुरवठा सुरळीत होण्याची साशंकता कायम असल्याने कच्च्या तेलाच्या भावात गुरुवारी 8 टक्क्यांहून अधिक वाढ झाली. ब्रेंट क्रूड ऑईलचा भाव 8.09 टक्क्यांनी वाढून 109 डॉलर्स प्रतिबॅरलवर गेला आहे. तर, यूएस डब्ल्यूटीआयचा भाव 108 डॉलर्स प्रतिबॅरल झाला आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button