ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपचा मंडल प्रशिक्षण वर्ग उत्साहात

संघटनात्मक उपक्रम : पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान

पिंपरी-चिंचवड | भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक बळकटीसाठी राबविण्यात येत असलेल्या ‘पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान २०२६’ अंतर्गत कासारवाडी येथील हॉटेल कलासागरमध्ये विशेष मंडल प्रशिक्षण वर्ग उत्साहात पार पडला. दिघी-गवळीनगर-गव्हाणेवस्ती आणि धावडेवस्ती-इंद्रायणीनगर-नेहरूनगर या दोन महत्त्वाच्या मंडळांतील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.

या प्रशिक्षण वर्गात शक्तीकेंद्र प्रमुख, बूथ प्रमुख तसेच सक्रिय कार्यकर्ते एकत्र आल्याने विचारांची देवाणघेवाण होऊन संघटनात्मक समन्वय अधिक दृढ झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. एकाच ठिकाणी दोन मंडळांचे प्रशिक्षण झाल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

यावेळी मार्गदर्शन करताना शहराध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे यांनी सांगितले की, “पक्षाची विचारप्रणाली आणि केंद्र व राज्य सरकारच्या लोककल्याणकारी योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवणे हेच कार्यकर्त्यांचे मुख्य उद्दिष्ट आहे. या प्रशिक्षणातून मिळणारे ज्ञान कार्यकर्त्यांना जनसेवेत अधिक सक्षम करेल.”

हेही वाचा       :                गॅस सिलिंडरच्या नियमात पुन्हा बदल होणार, केंद्र सरकारने उचललं ‘हे’ मोठं पाऊल 

प्रशिक्षणादरम्यान संघटन बांधणी, अंत्योदयाचा विचार आणि डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. बूथ स्तरावर पक्षाची उपस्थिती वाढविणे, शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचविणे आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून सरकारी योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविणे यावर विशेष भर देण्यात आला.

या कार्यक्रमाला आमदार महेशदादा लांडगे, आमदार अमितजी गोरखे, माजी खासदार अमरजी साबळे, हेमंतजी हरहरे, संघटन सरचिटणीस मोरेश्वर शेडगे, विकास डोळस, वैशाली खाड्ये, मधुकर बच्चे, महापौर रवी लांडगे, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, राजेशअण्णा पिल्ले, माजी सरचिटणीस राजू दुर्गे, मंडल अध्यक्ष प्रमोद परदेशी, शिवराज लांडगे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या प्रशिक्षण वर्गामुळे आगामी काळात पक्षाची संघटनात्मक पकड अधिक मजबूत होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

मंडल प्रशिक्षण वर्गातून कार्यकर्त्यांना केवळ संघटनात्मक दिशा नाही, तर विचारांची स्पष्टता आणि काम करण्याची नवी ऊर्जा मिळाली आहे. बूथ स्तरापासून नागरिकांपर्यंत पक्षाच्या योजना प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी प्रत्येक कार्यकर्ता कटिबद्ध असून, येणाऱ्या काळात अधिक सक्षम आणि समन्वयित पद्धतीने जनसेवा घडताना दिसेल.

– संजय पटनी, वरिष्ठ उपाध्यक्ष, भाजपा.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

 

 

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button