ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

रहाटणी-पिंपळे सौदागरमध्ये भाजपाचे पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाभियान

शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी प्रशिक्षणाचे यशस्वी आयोजन

पिंपरी-चिंचवड । प्रतिनिधी

भारतीय जनता पक्षाच्या ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाभियान २०२६’ अंतर्गत दोन दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण वर्गाचे आज चॅलेंजर पब्लिक स्कूल, पिंपळे सौदागर येथे यशस्वी समारोप झाला. भाजप शहराध्यक्ष आणि नगरसेवक शत्रुघ्न काटे यांच्या प्रमुख उपस्थितीत या महाभियानाचे समापन करण्यात आले.

शिबिराच्या दुसऱ्या दिवशी कार्यकर्त्यांना वैचारिक, तांत्रिक तसेच राजकीय क्षेत्रातील सखोल मार्गदर्शन देण्यात आले. या सत्रांमध्ये संतोष भालेराव यांनी भाजपच्या वैचारिक अधिष्ठानावर प्रकाश टाकला, विकास सक्सेना यांनी संघ परिचय दिला तर मोरेश्वर शेडगे यांनी पक्षाच्या कार्यपद्धतीची माहिती दिली. डिजिटल तंत्रज्ञानावर विशेष भर देत, डॉ. अमित नेमाणे यांनी कार्यकर्त्यांना सोशल मीडिया, AI, नमो App आणि सरल App च्या प्रभावी वापराबाबत प्रशिक्षित केले. तसेच राजेश अण्णा पिल्ले यांनी आगामी निवडणुकांसाठी बूथ व्यवस्थापनाचे सखोल मार्गदर्शन केले.

हेही वाचा     :           पवना नदी काठावर ‘जागतिक जल दिन’ उत्साहात

शिबिराचे अध्यक्षपद संजय भोसले, अनिताताई चोपडे, अतिश कांबळे, रेणुकाताई हेगडे, संकेत कुटे आणि संकेत माळेकर यांनी भूषवले. शिबिराला संगठन सरचिटणीस मोरेश्वरभाऊ शेडगे, राजेश अण्णा पिल्ले, राजाभाऊ दुर्गे, तसेच मंडल अध्यक्ष सोमनाथदादा तापकीर आणि नगरसेविका अनिताताई काटे, कुंदाताई भिसे यांनी उपस्थिती दिली.

या शिबिरातून भाजपच्या कार्यकर्त्यांना राजकीय, वैचारिक आणि तांत्रिक समृद्धी मिळाली असून, शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी काळात नगरपालिकेत संघटन अधिक सुदृढ होईल, अशी अपेक्षा आहे.

पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या अंत्योदय विचारांनी प्रेरित होऊन कार्य करणारा प्रत्येक कार्यकर्ता हाच भाजपचा खरा विजयस्तंभ आहे. प्रशिक्षित आणि शिस्तबद्ध कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आपण सरकारी योजना तळागाळापर्यंत पोहोचवू शकतो. रहाटणी-पिंपळे सौदागरच्या या शिबिरातून मिळालेली ऊर्जा आगामी काळात संघटन अधिक मजबूत करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल.

– शत्रुघ्न काटे, नगरसेवक तथा शहराध्यक्ष, भाजपा.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button