Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतला व्यावसायिक गॅस पुरवठ्याचा आढावा

सिंधुदुर्गनगरी : व्यावसायिक गॅस पुरवठ्याबाबत पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली BPCL, IOCL आणि HPCL या तीनही कंपन्यांच्या समन्वयकांची  तसेच जिल्ह्यातील हॉटेल व व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींची आढावा बैठक पार पडली. पर्यटन हंगामाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात व्यावसायिक गॅस पुरवठा सुरळीत राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे.  व्यावसायिक गॅसच्या तुटवड्यामुळे अनेक हॉटेल्स बंद पडण्याच्या मार्गावर असून, याचा थेट परिणाम जिल्ह्यातील पर्यटन व्यवसायावर होत आहे. हॉटेल व व्यापारी संघटनांच्या मागण्यांबाबत शासन स्तरावर पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी सांगितले.

हेही वाचा –  ‘आता डिझेल प्रति लिटर ५ रुपयांनी स्वस्त मिळणार’; मंत्री प्रताप सरनाईकांची मोठी घोषणा

या बैठकीला जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, जिल्हा पुरवठा अधिकारी श्री. सहारे यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.हॉटेल चालकांनी संयम बाळगून काम करावे आणि नागरिकांमध्ये कोणताही गैरसमज किंवा असंतोष निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहनही पालकमंत्री नितेश राणे यांनी केले. प्रशासनाशी प्रभावी समन्वय साधण्यासाठी हॉटेल व व्यापारी संघटनांनी आपले प्रतिनिधी नियुक्त करावेत असेही पालकमंत्री म्हणाले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button