Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मुंबई-गोवा महामार्गावर एलपीजी गॅस टँकर पलटी; मोठा अनर्थ टळला

Mumbai Goa Highway | मुंबई-गोवा महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना घडली असून सुदैवाने मोठी जीवितहानी टळली आहे. गुरुवारी सायंकाळी उशिरा कापडगाव-चरवेली परिसरात एलपीजी गॅस टँकर आणि वॉटर टँकर यांच्यात जोरदार धडक झाली. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून चालक जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने उपचारासाठी हलविण्यात आले.

धडकेनंतर एलपीजी टँकर रस्त्यावर पलटी झाल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, टँकरमधून गॅस गळती झाली नसल्याने संभाव्य मोठा अनर्थ टळला. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसीची अग्निशमन यंत्रणा आणि पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अतिरिक्त पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी, पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव, हेडकॉन्स्टेबल लक्ष्मण कोकरे आणि इतर कर्मचाऱ्यांनी तत्परतेने बचावकार्य सुरू केले.

हेही वाचा       :                महाराष्ट्रातील ‘जल जीवन मिशन २.०’ साठी केंद्र व महाराष्ट्र शासनात सामंजस्य करार

अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. क्रेनच्या सहाय्याने पलटी झालेला टँकर बाजूला करण्यात आला. त्यानंतर वाहतूक हळूहळू पूर्ववत करण्यात आली. कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली होती.

दरम्यान, या अपघातामुळे महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. वाहनचालकांनी अधिक सतर्कता बाळगण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button