Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीआंतरराष्ट्रीयताज्या घडामोडी

उत्तर कोरियात किम जोंग उन यांचा ९९.९३% मतांनी विजय, विरोधकच नाहीत!

Kim Jong Un | उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांनी नुकत्याच पार पडलेल्या संसदीय निवडणुकीत पुन्हा एकदा प्रचंड बहुमताने विजय मिळवला आहे. त्यांच्या ‘वर्कर्स पार्टी ऑफ कोरिया’ आणि मित्रपक्षांना तब्बल ९९.९३ टक्के मते मिळाल्याचा दावा सरकारी वृत्तसंस्था KCNA ने केला आहे.

१५ मार्च रोजी १५व्या ‘सुप्रीम पीपल्स असेंब्ली’च्या सदस्यांची निवड करण्यासाठी ही निवडणूक घेण्यात आली होती. अधिकृत माहितीनुसार, सत्ताधारी गटाने पाठिंबा दिलेले सर्व उमेदवार विजयी झाले आहेत. विशेष म्हणजे, प्रत्येक मतदारसंघात मतदारांसमोर केवळ एकच अधिकृत उमेदवार होता.

सरकारी आकडेवारीनुसार मतदानाची टक्केवारी ९९.९९ टक्के इतकी नोंदवण्यात आली. परदेशात किंवा समुद्रात कामावर असल्यामुळे केवळ ०.००३७ टक्के मतदार मतदान करू शकले नाहीत, तर अतिशय कमी म्हणजे ०.००००३ टक्क्यांहून कमी मतदारांनी मतदान टाळल्याचा दावा करण्यात आला आहे.

हेही वाचा      :      ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारताची गुढी उंचच उंच जात राहो’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस        

या निवडणुकीत कोणताही विरोधी उमेदवार नव्हता. त्यामुळे उर्वरित ०.०७ टक्के मते ही कोणत्याही विरोधी पक्षाला न जाता अधिकृत उमेदवाराच्या विरोधात ‘नकारार्थी’ स्वरूपात नोंदवली गेली. विशेष म्हणजे, १९५७ नंतर पहिल्यांदाच अशा प्रकारे विरोधात मतदान झाल्याची कबुली उत्तर कोरियाच्या सरकारी माध्यमांनी दिली आहे.

देशाच्या निवडणूक कायद्यानुसार कामगार, शेतकरी, लष्करी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसह एकूण ६८७ प्रतिनिधींची ‘सुप्रीम पीपल्स असेंब्ली’वर निवड करण्यात आली आहे.

२०११ मध्ये वडील किम जोंग इल यांच्या निधनानंतर किम जोंग उन सत्तेवर आले. त्यानंतर २०१९ मध्ये संविधानात बदल करून त्यांचे अधिकार अधिक बळकट करण्यात आले. सध्या सरकार, लष्कर आणि राज्य यंत्रणेवर त्यांचे पूर्ण नियंत्रण आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button