‘उच्च शिक्षण आणि शाश्वत विकास’ राज्यस्तरीय परिसंवाद उत्साहात
शिक्षण विश्व : डॉ. गीता शिंदे आणि डॉ. चित्रा सोहनी यांचे मार्गदर्शन

पिंपरी-चिंचवड : “उच्च शिक्षण आणि शाश्वत विकास” या विषयावर एकदिवसीय राज्यस्तरीय परिसंवाद Savitribai Phule Pune University यांच्या सहकार्याने गुणवत्ता सुधारणा कार्यक्रमांतर्गत कमला एज्युकेशन सोसायटी संचलित प्रतिभा शिक्षणशास्त्र महाविद्यालय, चिंचवड येथे उत्साहात पार पडला.
परिसंवादाचे उद्घाटन एसपीपीयूच्या विभागप्रमुख व वक्त्या डॉ. गीता शिंदे आणि प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ डॉ. चित्रा सोहनी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. पूर्णिमा कदम यांनी मान्यवरांचा पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार केला.
हेही वाचा : लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त विशेष कार्यक्रम
समारोप समारंभात प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सहभागी संशोधक व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. परिसंवादाचे प्रास्ताविक व आभार समन्वयिका प्रा. अस्मिता यादव यांनी मानले. या परिसंवादामुळे शिक्षक, संशोधक आणि विद्यार्थ्यांना शाश्वत विकासाच्या विविध पैलूंवर विचारमंथनाची संधी मिळाली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे सचिव डॉ. दीपक शहा, प्राचार्या डॉ. पूर्णिमा कदम तसेच सर्व प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले. एकूणच हा परिसंवाद यशस्वीरीत्या पार पडला.
गुणवत्तापूर्ण शिक्षण – एक शाश्वत ध्येय
उद्घाटन सत्रात मान्यवरांनी उच्च शिक्षणात शाश्वत विकासाची गरज अधोरेखित करत, शिक्षण प्रणालीमध्ये त्याचा समावेश कसा करता येईल याबाबत मार्गदर्शन केले. अध्यापन पद्धतींमधून शाश्वत मूल्यांचा प्रसार करण्यावरही सविस्तर चर्चा झाली. दुपारच्या सत्रात पी. ए. इनामदार विद्यापीठाच्या अधिष्ठाता डॉ. अनिता बेलापूरकर यांनी “शाश्वत विकासासाठी समावेशकता” या विषयावर मार्गदर्शन करत सर्वसमावेशक शिक्षणाचे महत्त्व स्पष्ट केले. “गुणवत्तापूर्ण शिक्षण – एक शाश्वत ध्येय” या सत्रात डॉ. अर्चना चौधरी यांनी दर्जेदार शिक्षण हे शाश्वत विकासाचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे सांगितले.




