Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर भीषण साखळी अपघात!

कार, कंटेनर आणि टँकरची जोरदार टक्कर; 4 जखमी, मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प

पुणे : मुंबई–पुणे एक्सप्रेस वेवर खोपोली एक्झिटजवळील नवीन बोगद्यानजीक आज सकाळी भीषण अपघात झाला. या अपघातात ४ ते ५ वाहने एकमेकांवर आदळल्याने ३ जणांचा जागीच मृत्यू झाला असून ४ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली
आहे.

हेही वाचा –   इंद्रायणीच्या शुद्धीकरणासाठी ५२५ कोटी; उदय सामंत यांची माहिती

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर हा अपघात घडला. कार, कंटेनर आणि टँकर यांच्यात जोरदार धडक झाल्याने अपघात अत्यंत गंभीर स्वरूपाचा होता. अपघातात एका कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला असल्याचे दृश्य घटनास्थळी पाहायला मिळाले.या दुर्घटनेनंतर मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि बचावकार्य सुरू केले. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृत व्यक्तींची ओळख पटवण्याचे काम सध्या सुरू असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.

दरम्यान, अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या कडेला हटवून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या प्रकरणी वाहतूक पोलिसांनी नोंद केली आहे. या बचावकार्यामध्ये आयआरबी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, बोरघाट महामार्ग वाहतूक पोलिस, खोपोली पोलिस ठाणे, डेल्टा फोर्स, महाराष्ट्र सुरक्षा बल तसेच विविध स्वयंसेवी संस्थांनी सहभाग घेतला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button