ताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

पुण्यात धक्कादायक! अल्पवयीन मुलीवर नातेवाईकांकडून अत्याचार

उच्चभ्रू सोसायटीत घडला प्रकार; आरोपींवर कठोर कारवाईची मागणी

पुणे | प्रतिनिधी : सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाणाऱ्या पुणे शहरात एक अत्यंत संतापजनक आणि माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. एका प्रतिष्ठित, सुरक्षित आणि उच्चभ्रू सोसायटीत राहणाऱ्या १५ वर्षीय अल्पवयीन गतिमंद मुलीवर तिच्याच तीन जवळच्या नातेवाईकांनी गेल्या सहा-सात महिन्यांपासून सातत्याने लैंगिक अत्याचार केल्याचे उघड झाले आहे. भारती विद्यापीठ पोलिसांनी या प्रकरणातील तिन्ही आरोपींना तात्काळ अटक केली असून, शहरात संताप आणि भीतीचे वातावरण पसरले आहे.

हेही वाचा : विमान प्रवाशांना मोठा दिलासा; ६०% सीट सिलेक्शन आता मोफत..!

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी अल्पवयीन असून तिची मानसिक स्थिती सामान्य नाही. या कमकुवतपणाचा आणि निरुपाय अवस्थेचा पूर्ण फायदा घेत तिच्याच नात्यातील तीन व्यक्तींनी तिला आपल्या जाळ्यात ओढले. हे आरोपी घराशेजारीच राहत असल्याने आणि कुटुंबीयांना पूर्ण ओळखीचे असल्याने मुलीच्या घरात येण्या-जाण्यास कोणतीही अडचण नव्हती. याच ओळखीचा आणि विश्वासाचा गैरवापर करून आरोपींनी सोसायटीच्या क्लब हाऊसच्या स्वच्छतागृहात तसेच इतर वेगवेगळ्या ठिकाणी तिच्यावर वारंवार अत्याचार केले. हा प्रकार गेल्या सहा-सात महिन्यांपासून सुरू होता.

सततच्या अत्याचारामुळे पीडित मुलीच्या स्वभावात आणि वागण्यात अचानक मोठे बदल दिसू लागले. ती नेहमी भेदरलेली, घाबरलेली आणि अस्वस्थ राहू लागली. कुटुंबीयांच्या लक्षात हे बदल आल्याने त्यांनी तिला प्रेमाने आणि विश्वासात घेऊन विचारपूस केली. सुरुवातीला काहीच बोलू न शकलेली मुलीने नंतर भावनिक होऊन सर्व धक्कादायक आपबिती सांगितली. ज्यांना कुटुंब आपले समजत होते, त्यांनीच तिचे बालपण आणि आयुष्य उद्ध्वस्त केल्याचे समजताच पालक हादरले आणि त्वरित भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात धाव घेतली.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button