Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रराजकारण

बारामती आणि राहुरीची पोटनिवडणूक जाहीर; ‘या’ दिवशी होणार मतदान, निवडणूक आयोगाची मोठी घोषणा

Baramati and Rahuri ByPoll Election : केंद्रीय निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेत आसाम, केरळ, पुदुच्चेरी, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल या राज्यांमधील विधानसभा निवडणुकीची घोषणा केली आहे. यावेळी महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील बारामती आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचीही घोषणा करण्यात आली आहे.

बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक २३ एप्रिल रोजी होणार आहे. तसेच ४ मे रोजी या पोटनिवडणुकीचा निकाल म्हणजेच मतमोजणी होणार आहे. ३० मार्च २०२६ रोजी या निवडणुकीची अधिसूचना जारी करण्यात येणार असल्याचं केंद्रीय निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं आहे.

हेही वाचा –  लाडक्या बहिणींना सरकारचं मोठं सरप्राईज; लाभार्थी महिलांना मिळणार थेट 3 हजार रुपये

पोटनिवडणुकीचा कार्यक्रम कसा असेल?

निवडणुकीसाठीची अधिसूचना : ३० मार्च २०२६

उमेदवारी अर्ज दाखल : ६ एप्रिल २०२६

अर्ज छाननी : ७ एप्रिल २०२६

अर्ज मागे घेण्याची तारीख : ९ एप्रिल २०२६

मतदान : २३ एप्रिल २०२६

मतमोजणी : ४ मे २०२६

दरम्यान, अजित पवारांचं २८ जानेवारी रोजी विमान अपघातात निधन झाल्यामुळे बारामती विधानसभेची जागा रिक्त झाली होती, तर अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचंही काही दिवसांपूर्वी निधन झालं होतं, त्यामुळे राहुरी विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली होती. त्यामुळे निवडणूक आयोगाने या दोन्ही विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची घोषणा केली आहे.

बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीबाबत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचं भाष्य केलं. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “बारामती आणि राहुरी या दोन्ही पोटनिवडणुका या बिनविरोध व्हाव्यात असा आमचा प्रयत्न असेल. पण आमच्यावर जर निवडणूक लादली गेली तर आम्हीही निवडणूक लढायला तयार आहोत”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button