Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीआंतरराष्ट्रीयताज्या घडामोडी

अमेरिकेची ‘डूम्सडे’ क्षेपणास्त्र चाचणी; हिरोशिमा अणुबॉम्बपेक्षा 20 पट शक्तिशाली

Doomsday Missile | मध्य पूर्वेत अमेरिका–इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने अण्वस्त्रसक्षम आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची (ICBM) चाचणी घेतल्याची माहिती समोर आली आहे. अमेरिकन हवाई दलाने कॅलिफोर्नियातील वॅंडनबर्ग स्पेस फोर्स बेसवरून ‘मिनिटमॅन III’ या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली.

अमेरिकेच्या एअर फोर्स ग्लोबल स्ट्राइक कमांडने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री ही चाचणी करण्यात आली. निशस्त्र स्वरूपातील जीटी-२५५ मिनिटमॅन III क्षेपणास्त्र प्रक्षेपित करण्यात आले. हे क्षेपणास्त्र हजारो मैलांचा प्रवास करून पश्चिम-मध्य पॅसिफिक महासागरातील मार्शल बेटांजवळील लक्ष्यावर यशस्वीपणे धडकले.

अमेरिकन स्पेस फोर्सच्या निवेदनात या क्षेपणास्त्राला “डूम्सडे क्षेपणास्त्र” असे संबोधण्यात आले आहे. हे क्षेपणास्त्र अण्वस्त्र वाहून नेण्यास सक्षम असून त्याची शक्ती दुसऱ्या महायुद्धादरम्यान जपानमधील हिरोशिमावर टाकलेल्या अणुबॉम्बपेक्षा सुमारे २० पट अधिक असल्याचे सांगितले जाते.

हेही वाचा       :                  फक्त व्हॉट्सअ‍ॅप चॅट पुरेसे नाहीत; घटस्फोट प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्वाळा

अमेरिकन हवाई दलाच्या माहितीनुसार, मिनिटमॅन III क्षेपणास्त्राची मारक क्षमता सुमारे ६,००० मैल आहे. तसेच ते ताशी सुमारे १५,००० मैल वेगाने प्रवास करू शकते. जगातील कोणत्याही लक्ष्यावर काही मिनिटांत मारा करण्याची क्षमता असल्यामुळे हे क्षेपणास्त्र अत्यंत घातक मानले जाते.

दरम्यान, ही चाचणी मध्य पूर्वेत सुरू असलेल्या युद्धाशी संबंधित नसून दीर्घकालीन चाचणी प्रक्रियेचा भाग असल्याचे अमेरिकेने स्पष्ट केले आहे. क्षेपणास्त्र प्रणालीच्या विविध घटकांची कार्यक्षमता तपासणे हा या चाचणीचा मुख्य उद्देश असल्याचेही सांगण्यात आले.

यापूर्वी नोव्हेंबर २०२५ मध्येही मिनिटमॅन III क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आली होती. त्यावेळी अमेरिकेच्या अण्वस्त्र तयारीवरून देशात मोठा राजकीय व धोरणात्मक वाद निर्माण झाला होता.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button