Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराष्ट्रिय

कच्च्या तेलाची सागरी वाहतूक विस्कळीत; महागाईचा धोका

नवी दिल्ली : अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या लष्करी कारवाईनंतर आखाती देशांमधील संघर्ष तीव्र झाला आहे. त्यामुळे केवळ कच्च्या तेलाची वाहतूकच नव्हे, तर जागतिक समुद्री वाहतूक धोक्यात आली आहे. त्यामुळे व्यापार विस्कळीत होऊन महागाईचा भडका उडण्याचा धोका तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

इराण युद्धामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीतील तेल टँकरची वाहतूक थांबली आहे. तसेच जागतिक पुरवठा साखळीतही व्यत्यय येत आहे. भारतातील औषधे, आशियातील सेमीकंडक्टर आणि मध्य पूर्वेतून येणार्‍या खतांसारख्या मालाची वाहतूक विस्कळीत होईल. याशिवाय कच्च्या तेलापासून तयार झालेल्या उत्पादनांच्या वाहतुकीवर विपरित परिणाम होत आहे. सध्या मालवाहू जहाजे आखातात अडकली आहेत किंवा आफ्रिकेच्या दक्षिण टोकावर बराच मोठा वळसा घालून जहाजे प्रवास करत आहेत. मध्य पूर्वेतून हवाई माल वाहून नेणारी विमाने जमिनीवरच ठेवण्यात आली आहेत. युद्ध जितके जास्त काळ चालेल तितकेच विविध प्रकारच्या वस्तूंचा तुटवडा होऊन किमती वाढण्याची शक्यता अधिक असते. सिराक्यूज विद्यापीठातील पुरवठा साखळी प्रॅक्टिसचे प्राध्यापक पॅट्रिक पेनफिल्ड म्हणाले. हा संघर्ष जसजसा वाढत जाईल तसतसे टंचाई जाणवू लागेल. काही वस्तूंच्या किमतीत मोठी वाढ होताना दिसेल.

हेही वाचा –  ‘आरोग्य क्षेत्रात’ पल्स’ मुळे जगात महाराष्ट्राचा लौकिक वाढणार’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मध्य पूर्व प्रदेशातून विविध उत्पादने पाठवली जातात. या प्रदेशातून येणार्‍या जगातील सुमारे 20 टक्के तेलासह प्लास्टिक आणि रबर बनवण्यासाठी वापरल्या जाणार्‍या पेट्रोकेमिकल फीडस्टॉक आणि नायट्रोजन खतासारख्या नैसर्गिक वायूपासून बनवलेली उत्पादने मध्य पूर्वेतून येतात. भारतातून निर्यात केलेली औषधे आणि आशियातून उर्वरित जगाला निर्यात केलेली सेमीकंडक्टर चिप आणि बॅटरीची वाहतूक या प्रदेशातून होते. युद्धामुळे या वस्तू विलंबाने मिळतील.

होर्मुझच्या सामुद्रधुनीवरील निर्बंधांव्यतिरिक्त, अस्थिरतेमुळे लाल समुद्र आणि सुएझ कालव्यात वाहतुकीवर अडथळा निर्माण झाला आहे. हुथींमुळे या प्रदेशात अस्थिरता होती. शिपिंग कंपनी मार्स्कने सुएझ कालवा आणि लाल समुद्रात वाहतूक पुन्हा सुरू केली होती. या संघर्षानंतर कंपनीने आफ्रिकेतील केप ऑफ गुड होपमार्गे वाहतूक करण्याचे जाहीर केले.

शिपिंग डेटाचा मागोवा घेणार्‍या क्लार्कसन रिसर्चने वर्तविलेल्या अंदाजानुसार सुमारे 3,200 जहाजे किंवा जागतिक व्यापाराच्या सुमारे 4 टक्के जहाजे पर्शियन आखातात थांबली आहेत. थांबलेल्या जहाजांपैकी 1,231 जहाजे अशी आहेत, ती केवळ आखाती देशांच्या मार्गावरच चालतात. यातील 500 जहाजे युएई आणि ओमानच्या बंदरांमध्ये आहेत.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button