ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपळे सौदागरमध्ये शिव छत्रपती लिनिअर गार्डन परिसर ‘‘चकाचक’’

भाजपा शहराध्यक्ष तथा नगरसेवक शत्रुघ्न काटे यांचा पुढाकार

नागरिकांच्या तक्रारींची तत्काळ दखल घेत स्वच्छता मोहीम

पिंपरी-चिंचवड | पिंपळे सौदागर येथील शिव छत्रपती लिनिअर गार्डन परिसरातील वाढत्या अस्वच्छतेच्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेत शहराध्यक्ष तथा नगरसेवक शत्रुघ्न (बापू) काटे यांनी तात्काळ कारवाईचे आदेश दिले आहेत. फुटपाथ लगत व प्लाझा परिसरात झाडांच्या पानगळतीमुळे मोठ्या प्रमाणात कचरा साचत असल्याबाबत नागरिकांकडून सातत्याने तक्रारी येत होत्या.

नागरिकांच्या समस्या सोडवण्यास प्राधान्य देत शत्रुघ्न काटे यांनी महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाशी त्वरित संपर्क साधून साफसफाई मोहीम राबवण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या. त्यांच्या पाठपुराव्यामुळे पालिका प्रशासनाने तत्काळ हालचाल करत लिनिअर गार्डन परिसरातील फुटपाथ व प्लाझा भागात स्वच्छता मोहिमेला सुरुवात केली आहे. या उपक्रमात नगरसेविका सौ. अनिताताई काटे व नगरसेविका सौ. कुंदाताई भिसे यांनीही सहकार्य केले. मात्र या संपूर्ण मोहिमेच्या केंद्रस्थानी शत्रुघ्न (बापू) काटे यांचा ठाम पाठपुरावा आणि प्रशासनाशी सातत्यपूर्ण समन्वय राहिला.

हेही वाचा          :              महापालिका क्रीडा विभागाला अखेर जाग : युमनानगर येथील जलतरण तलावाची दुरूस्ती सुरू!

“परिसर स्वच्छ, सुरक्षित आणि सुस्थितीत ठेवणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. पालिकेने नियमित व सातत्याने स्वच्छता ठेवावी, तसेच नागरिकांनीही परिसर स्वच्छ राखण्यासाठी सहकार्य करावे,” असे आवाहन शत्रुघ्न काटे यांनी केले. या स्वच्छता उपक्रमामुळे परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला असून स्थानिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. नागरिकांच्या तक्रारींना तत्पर प्रतिसाद देत प्रत्यक्ष कृतीतून समस्या सोडवण्याचा शत्रुघ्न (बापू) काटे यांचा प्रयत्न पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.

“पिंपळे सौदागरमधील प्रत्येक परिसर स्वच्छ, सुरक्षित आणि सुंदर ठेवणे ही आमची प्राथमिक जबाबदारी आहे. नागरिकांनी मांडलेल्या तक्रारींवर तात्काळ कार्यवाही करणे आणि भविष्यात अशा समस्या उद्भवू नयेत यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करणे, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. प्रशासन आणि नागरिकांच्या सहकार्याने आपला परिसर आदर्श बनवू.”

– शत्रुघ्न काटे, शहराध्यक्ष तथा नगरसेवक, भाजपा.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button