Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

PCMC | स्थायी समितीसह सर्व समित्यांच्या सदस्यांची आज निवड

पिंपरी | पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीसह विविध विषय समित्यांच्या सदस्यांची निवड आज (दि. २०) सकाळी ११ वाजता महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत होणार आहे. महापौर आणि उपमहापौर पदाची निवड ६ फेब्रुवारीला झाल्यानंतर तहकूब ठेवलेली सभा आज पुन्हा बोलावण्यात आली आहे.

महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपने ८४ नगरसेवक आणि एक पुरस्कृत सदस्य अशा एकूण ८५ जागांवर विजय मिळवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ३७ आणि शिवसेनेचे ६ नगरसेवक निवडून आले आहेत. संख्याबळानुसार भाजपचे रवी लांडगे यांची महापौर तर शर्मिला बाबर यांची उपमहापौर म्हणून बिनविरोध निवड झाली होती.

हेही वाचा      :            ‘वर्षअखेर एसटी आर्थिकदृष्ट्या सुदृढ होणार’; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

स्थायी समितीत एकूण १६ सदस्यांची निवड होणार असून त्यामध्ये भाजपचे ११, राष्ट्रवादी काँग्रेसचे ४ आणि शिवसेनेचा १ सदस्य असणार आहे. परंपरेनुसार गटनेते आपल्या सदस्यांची नावे बंद लिफाफ्यात महापौरांकडे सादर करतात. त्यानंतर महापौर सभागृहात नावांची घोषणा करून सदस्यांची निवड जाहीर करतात.

मागील सभेत महापौर आणि उपमहापौरांची निवड झाल्यानंतर दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली वाहून सभा २० फेब्रुवारीपर्यंत तहकूब करण्यात आली होती. आज होणाऱ्या सभेत स्थायी समितीसह महिला व बालकल्याण, शिक्षण, विधी, शहर सुधारणा, जैवविविधता, क्रीडा व सांस्कृतिक आदी विषय समित्यांवरील सदस्यांचीही निवड होणार आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button