Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

नंदनवन हौसिंग सोसायटी आवास योजना ( पिंपरी ) येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

Share On

पिंपरी : पिंपरी-चिंचवड उद्यमनगर येथील नंदनवन सोसायटीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त उत्सव समितीच्या वतीने भव्य आणि उत्साहपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. सोसायटीतील सर्व पुरुष व महिला भगिनींनी एकत्र येत अभिवादन केले व त्यानंतर सामूहिक शिववंदना घेण्यात आली.
या प्रसंगी उत्सव समितीचे अध्यक्ष भागवत चौधरी, उपाध्यक्षा शिवाणी म्हैसकर, विजय शेवते,उतळे काका, तेजस्विनीताई उंडे, रेश्मा जरे, निशा कुलकर्णी, स्वातीताई बढे तसेच सोसायटीतील इतर पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमामध्ये लहान मुलांनी पोवाडा गायन, शिवगर्जना तसेच शिवाजी महाराजांवरील भाषण स्पर्धा सादर केल्या. यासोबतच ‘किल्ले ओळखा’, ‘मावळे ओळखा’ यांसारख्या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विशेषतः महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत स्टेज सजावट, आकर्षक रांगोळी तसेच शिवपाळणा गायन करून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

हेही वाचा –  एआय समिटच्या निमित्तानं भारत-यूएई संबंधांना नवी चालना; क्राउन प्रिंस खालिद यांची पंतप्रधान मोदींसोबत बैठक

आपल्या मनोगतात बोलताना भाई रहीम सय्यद यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती-धर्मांना सोबत घेऊन स्वराज्याची स्थापना केली व रयतेचे राज्य निर्माण केले, हे अधोरेखित केले. महाराज कोणत्याही जाती-धर्माच्या विरोधात नव्हते, तर त्यांनी सर्वसमावेशक आणि न्याय्य राज्यकारभार केला, असे सांगत स्वराज्यातील मुस्लिम सेवक व मुस्लिम मावळ्यांच्या योगदानाची माहितीही त्यांनी उपस्थितांना दिली. कार्यक्रम यशस्वी पार पडल्याबद्दल त्यांनी आयोजक व उपस्थित सर्वांचे आभार भाई रहिम एम सय्यद यांनी मानले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सुभाषजी बढे (गुरुजी) यांनी प्रभावीपणे केले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button