Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

माजी विद्यार्थी रमले जुन्या आठवणीत

पिंपरी-चिंचवड :  महाविद्यालयातील धमाल, ग्रुप मध्ये केलेला अभ्यास, शिक्षकांची आदर युक्त भीती, महाविद्यालयातील विविध स्पर्धा, शिक्षकांनी दिलेल्या शिक्षा, मौखिक व प्रात्यक्षिक परीक्षा च्या वेळेची परिस्थिती, शैक्षणिक सहल, स्नेहसंमेलन आणि त्यातील सांस्कृतिक कार्यक्रम अशा विविध विषयावर माजी विद्यार्थ्यांनी गप्पा करत जुन्या आठवणी मध्ये हरवून गेले होते. या सर्व गप्पांमध्ये सर्वजण आपले वय व सध्याचा हुद्दा हे विसरून गेले होते. निमित्त होते आकुर्डी येथील डॉ. डी वाय पाटील शैक्षणिक संकुलातील डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या 2005 उत्तीर्ण बॅच विद्यार्थ्यांचा मेळावा. 20 वर्षात शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा शनिवारी आकुर्डी येथील डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित करण्यात आला होता. या महाविद्यालयातील शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी आज राजकारण उद्योग शिक्षण सांस्कृतिक सामाजिक क्षेत्रात काम करीत असून त्यांनी आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटविला आहे.

यावेळी व्यासपीठावर डी वाय पाटील महाविद्यालयाच्या अलुमनी असोसिएशनच्या गव्हर्निंग बॉडीचे प्रेसिडेंट स्वप्निल साळुंके, व्हाईस प्रेसिडेंट आकाश लोखंडे, महाविद्यालयाच्या अलुमनी समन्वयक व असोसिएशनच्या ट्रेजरर नीलम पाटील, असोसिएशनचे सदस्य डॉ. प्रशांत तीतरे, कॅम्पस डायरेक्टर रियर ऍडमिरल अमित विक्रम (निवृत्त), महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. पी मालथी, प्लेसमेंट अधिष्ठाता जस्मिता कौर, विद्यार्थी कल्याणअधिष्ठाता डॉ. स्मिता पाटसकर आदी उपस्थित होते.

यावेळी गव्हर्निंग बॉडीचे प्रेसिडेंट स्वप्निल साळुंके म्हणाले महाविद्यालयानेच जीवनातील यशाचा रस्ता बांधणी केली आहे. महाविद्यालयातून मिळालेल्या विविध मौलिक मूल्येच बाहेरील जगाशी संबंध प्रस्थापित करण्यास उपयुक्त ठरतात व त्यातूनच यश प्राप्ती होते. तसेच आजच्या डिजिटल युगामध्ये प्रत्येक अलुमनी पर्यंत पोहोचण्यास काहीही अडचण येणार नाही व त्यासाठी डिजिटल पोर्टलची सुरुवात करण्यात येणार आहे त्यामुळे मोठ्या संख्येने अलुमनी या असोसिएशन बरोबर जोडले जातील. तसेच सध्याच्या काळात नोकरीच्या ठिकाणी कामाचे स्वरूप हे निश्चित नाही व महाविद्यालयांमध्ये सुद्धा अशा आव्हानात्मक कामाचे शिक्षण अभ्यासक्रमात समाविष्ट नसल्यामुळे दिले जात नाही. त्यामुळे माजी विद्यार्थ्यांनी सध्याच्या शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना सध्याच्या काळातील लागणारी विविध कौशल्य विद्यार्थ्यांना ज्ञात करून दिली पाहिजेत तसेच विद्यार्थ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले पाहिजे जेणेकरून त्यांना यश प्राप्त करण्यास मदत होईल. औद्योगिक प्रशिक्षण देण्यासाठी माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला पाहिजे असे आव्हान केले आणि अलुमनी असोसिएशन मजबूत करण्यासाठी अलुमनी जाळे प्रस्थापित करण्याची गरज असल्याचे सांगितले. महाविद्यालयाबरोबर अलुमनीचा संपर्क वाढवण्याकरता माजी विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रम तयार करणे, मौखिक परीक्षा, प्लेसमेंट ऍक्टिव्हिटी, औद्योगिक भेट, औद्योगिक प्रशिक्षण यासारख्या विविध कामात सहभाग घ्यावा अशी इच्छा व्यक्त केली.

हेही वाचा – पिंपरी चिंचवड महापालिकेचा ७०२ कोटींचा मालमत्ता कर वसूल

महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. पी मालथी यांनी सर्व उपस्थित माजी विद्यार्थ्यांचे स्वागत केले व महाविद्यालयाच्या सध्याच्या प्रगतीची माहिती दिली. महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी संपूर्ण जगात आपला ठसा आपल्या कार्यामधून उमटवित असल्याने त्याचा महाविद्यालयास सार्थ अभिमान असल्याचे नमूद केले.

संकुलाचे संचालक रियर एडमिरल अमित विक्रम (निवृत्त) यांनी बिझनेस मीटिंग, एक्सपर्ट सेशन, स्टुडन्ट डेव्हलपमेंट सेशन, सेमिनार यासारखे कार्यक्रम माजी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयामध्ये घ्यावेत असे आव्हान केले आणि माजी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयास केलेल्या विविध मदतीची माहिती देऊन माजी विद्यार्थ्यांचे आभार मानले.

सर्व माजी विद्यार्थी एकत्र आल्यावर सर्वांनी आपला परिचय दिल्यावर त्यावेळच्या काही गमतीदार आणि काही चांगल्या आठवणींना उजाळा दिला अनेक विद्यार्थी पुण्याबाहेरील असून ते या मेळाव्याच्या निमित्ताने एकत्र आले होते यावेळी माजी विद्यार्थ्यांसाठी मिराकी बँड मनोरंजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तसेच डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय आणि विविध कंपन्यासोबत सामंजस करार करण्यात आला. वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत असताना जीवनात यश मिळवले असले तरी त्यामागे महाविद्यालयाचे शिक्षण व संस्कार आहेत अशी भावना अनेक माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. तसेच नीलम पाटील यांनी अलुमनी असोसिएशनचे लिंक्डइन या पेजला जॉईन होण्यास आणि जास्तीत जास्त रजिस्ट्रेशन करण्यास आव्हान केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा नीलम पाटील यांनी केले व आभार प्रदर्शन डॉ स्मिता पाटसकर यांनी केले. या कार्यक्रमाचे समन्वयक प्रा नीलम पाटील व प्रा अवधूत कुलकर्णी होते. या कार्यक्रमाच्या आयोजन करण्यासाठी संकुलाचे अध्यक्ष मा श्री सतेज पाटील व विश्वस्त मा श्री तेजस पाटील संकुलाचे संचालक रियर एडमिरल अमित विक्रम (निवृत्त) यांचे मार्गदर्शन लाभले होते.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button