युनिफाईट कुस्ती स्पर्धेत पिंपरी-चिंचवडचा डंका; १३ खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

पिंपरी-चिंचवड: श्रीगोंदा (अहिल्यानगर) येथे २३ जानेवारी रोजी पार पडलेल्या विभागीय युनिफाईट स्पर्धेमध्ये पिंपरी-चिंचवडमधील खेळाडूंनी घवघवीत यश संपादन केले आहे. या स्पर्धेत शहरातील विविध शाळांमधील एकूण २७ खेळाडू सहभागी झाले होते, त्यापैकी १३ खेळाडूंनी आपली मोहोर उमटवत पनवेल येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत.
यशस्वी शाळा आणि खेळाडू
या स्पर्धेत न्यू इंग्लिश मीडियम स्कूल (थेरगाव), एम.एम. माध्यमिक विद्यालय (काळेवाडी), सेंट पीटर्स स्कूल, बालाजी स्कूल, पार्वती इंग्लिश मीडियम स्कूल आणि सिम्बॉयसिस कॉलेजमधील खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता.
राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेले खेळाडू:
उत्तम भाटी, ऋषिकेश हाके, चिन्मय मस्के, प्रणव माने, बालाजी जाधव.
तेहरीन पटेल, जान्हवी शिंदे, तेजस्वी जाधव, वैष्णवी हिप्परकर.
गणेश मोरे, रवीना कुमावत, धृविता चव्हाण, ऋषिकेश विश्वकर्मा.
वाढती लोकप्रियता आणि उज्ज्वल भविष्य
गेल्या पाच वर्षांत पिंपरी-चिंचवड आणि संपूर्ण महाराष्ट्रात ‘युनिफाईट’ खेळाची लोकप्रियता झपाट्याने वाढली आहे. खेळाडू आणि क्रीडा शिक्षकांमध्ये या खेळाबद्दल असलेली ओढ पाहता, भविष्यात या क्षेत्रात नामवंत खेळाडू घडतील, असा विश्वास क्रीडा तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
हेही वाचा –भारत न्यूझीलंड यांच्यात तिसरा सामना,मालिका खिशात घालण्यासाठी टीम इंडिया सज्ज!
मार्गदर्शकांकडून कौतुक
पिंपरी चिंचवड युनिफाईट स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष श्री. यशवंत माने, सचिव संदीप माने, वरिष्ठ मार्गदर्शक विष्णुपंत पाटील, सुरेश कोळी, आणि प्रफुल प्रधान यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले. तसेच पंच म्हणून कामगिरी बजावलेल्या गिरिजा मस्के, गौतम प्रजापती आणि अथर्व कावरे यांचेही कौतुक करण्यात आले.
महाराष्ट्र युनिफाईट वेल्फेअर संघटनेचे अध्यक्ष श्री. संतोष खंदारे व सचिव श्री. मंदार पनवेलकर यांनी खेळाडूंच्या या यशाबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
“खेळाडूंचे भविष्य उज्ज्वल”
पिंपरी चिंचवड युनिफाईड स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष श्री. यशवंत माने यांनी या यशाबद्दल आनंद व्यक्त करताना सांगितले की,
”युनिफाईट हा खेळ केवळ शारीरिक ताकदच नाही तर मानसिक चपळता वाढवणारा खेळ आहे. पिंपरी-चिंचवडमधील मुलांमध्ये उपजत कौशल्य असून, गेल्या ५ वर्षांत आम्ही या खेळाचा तळागाळापर्यंत प्रसार केला आहे. आज निवड झालेले १३ खेळाडू राज्य स्तरावर नक्कीच सुवर्णपदक पटकावतील आणि शहराचे नाव उज्ज्वल करतील, याची मला खात्री आहे. आगामी काळात या खेळाडूंना जागतिक दर्जाचे प्रशिक्षण देण्याचा आमचा मानस आहे.”




