Uncategorized
आठ राज्यांमधल्या पोटनिवडणुकीत भाजपची सरशी, मोदी म्हणतात…
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2017/04/modi-varanasi-pti11.jpg)
नवी दिल्ली : आठ राज्यांमधल्या पोटनिवडणुकीमध्ये भाजपची सरशी झाली आहे. १० जागांपैकी ५ जागांवर भाजपचा विजय झाला आहे तर काँग्रेसला ३ जागांवर समाधान मानावं लागलं आहे.
पोटनिवडणुकीमध्ये झालेल्या या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रतिक्रिया दिली आहे. विकास आणि चांगल्या सुशासनाबद्दल नागरिकांचे धन्यवाद आणि कार्यकर्त्यांचे आभार, असं ट्विट नरेंद्र मोदींनी केलं आहे.
१० विधानसभेच्या जागांचा निकाल
राजौरी गार्डन, दिल्ली – भाजप विजयी
बांधवगढ, मध्यप्रदेश – भाजप विजयी
अटेर, मध्यप्रदेश – काँग्रेस विजयी
भोरंज, हिमाचल प्रदेश – भाजप विजयी
भीमाजी, असाम – भाजप विजयी
नंजनगुड, कर्नाटक – काँग्रेस विजयी
गुंडलुपेट, कर्नाटक – काँग्रेस विजयी
कांथी दक्षिण, पं. बंगाल – टीएमसी विजयी
धौलपूर, राजस्थान – भाजप विजयी
लिट्टीपाडा, झारखंड – जेएमएम विजयी