TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

अमेरिकेतून भारतासाठी सर्वात मोठी गुड न्यूज, टॅरिफ संकट टळलं

अमेरिकेनं भारतावर यापूर्वीच अतिरिक्त 25 टक्के टॅरिफ

राष्ट्रीय : अमेरिकेनं भारतावर यापूर्वीच अतिरिक्त 25 टक्के टॅरिफ लावला आहे. म्हणजेच भारतीय वस्तूंवर अमेरिकेत सध्या स्थितीमध्ये 50 टक्के टॅरिफ आकारला जात आहे. मात्र तरी देखील भारताची रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरूच आहे. त्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर थेट 500 टक्के टॅरिफ लावण्याची धमकी दिली होती. त्यामुळे भारताची चिंता वाढली होती.

मात्र आता अमेरिकेतून भारतासाठी एक चांगली बातमी आली आहे, ती म्हणजे आता अमेरिकेकडून भारतावर आणखी जास्त टॅरिफ वाढवण्याचा धोका टळला आहे. दुसरीकडे भारतानं देखील रशियाकडून होणारी तेलाची खरेदी मोठ्या प्रमाणात कमी केली आहे.भारतानं रशियाकडून तेलाची खरेदी कमी करण्याचं एक मुख्य कारण म्हणजे गेल्या अनेक दिवसांपासून अमेरिका आणि भारताची एका मोठ्या ट्रेड डीलवर चर्चा सुरू आहे. आता ती लवकरच पूर्ण होण्याची शक्यता आहे.

याबाबत बोलताना भारताचे वाणिज्य सचिव राजेश अग्रवाल यांनी गुरुवारी म्हटलं की, भारत आणि अमेरिकेमध्ये ट्रेड डीलवर चर्चा सुरूच आहे. अमेरिकेनं भारतावर 50 टक्के टॅरिफ लावला आहे, मात्र असं असताना देखील अमेरिकेमधील भारताची निर्यात ही वाढतच आहे. एक सकारात्मक वृद्धी या निर्यातीमध्ये दिसून येत आहे.

हेही वाचा      :            ‘ट्रान्सेंड गोवा 2026’चे उद्घाटन; उदयोन्मुख सर्जनशील अर्थव्यवस्थेवर भर 

पुढे बोलताना अग्रवाल यांनी असंही म्हटलं की, दोन्ही देश या व्यापारी ट्रेड डीलसाठी उत्सुक आहे, दोन्ही देशांना देखील असं वाटत आहे की, कोणत्याही परिस्थितीमध्ये ही टेड्र डील लवकरात लवकर होऊ शकते.गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल तसेच अमेरिकेचे व्यापारी प्रतिनिधी जेमीसन ग्रीर यांच्यामध्ये डिजिटल माध्यमातून महत्त्वाची बैठक पार पडली होती, असंही ते यावेळी म्हणाले.

कोणत्या मुद्द्यावर अडकली डील

भारत आणि अमेरिकेमध्ये एक मोठी व्यापारी डील होणार आहे, ज्याचा फायाद हा दोन्ही देशांना मोठ्या प्रमाणात होणार आहे. मात्र अमेरिकेच्या डेअरी सेक्टर आणि कृषी सेक्टरला भारत आपली बाजारपेठ उपलब्ध करून देण्यास तयार नसल्यानं ही डील आडकल्याचं बोललं जात आहे, परंतु आता लवकरच ही डील होण्याची शक्यता आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button