ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मिशन–PCMC : डर नाही, समझोता नाही… लढा शेवटपर्यंत!

प्रभाग क्रमांक 20 मध्ये डॉ. सुलक्षणा शिलवंत यांची दमदार उमेदवारी

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक–2026 च्या पार्श्वभूमीवर मिशन–PCMC अंतर्गत प्रभाग क्रमांक 20 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या वतीने डॉ. सुलक्षणा शिलवंत यांनी दमदार उमेदवारी जाहीर केली आहे. “डर नाही, समझोता नाही… लढा शेवटपर्यंत!” या ठाम घोषणेसह त्यांनी निवडणूक प्रचाराला वेग दिला आहे.

डॉ. सुलक्षणा शिलवंत या अशोक सहकारी बँकेचे संस्थापक, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दिवंगत अशोक शिलवंत यांच्या विचारांनी प्रेरित असून त्यांनी समाजसेवेचा वारसा पुढे नेला आहे. आरोग्यसेवा, महिला सक्षमीकरण आणि सर्वसामान्य नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांसाठी त्या सातत्याने कार्यरत राहिल्या आहेत.

प्रभाग क्रमांक 20 मधील पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्त्यांची दुरवस्था, आरोग्य सुविधा, तसेच युवकांसाठी रोजगार व कौशल्य विकासाच्या संधी निर्माण करणे हे त्यांच्या प्रचारातील प्रमुख मुद्दे आहेत. घराघरांत जाऊन नागरिकांशी संवाद साधत त्या विकासाभिमुख आणि पारदर्शक कारभाराचा संकल्प मांडत आहेत.

हेही वाचा      :        ७० हजार कोटींच्या आरोपांचे पुढे काय झाले? संजय राऊतांचा सवाल 

प्रचारादरम्यान त्यांनी “संघर्षातून घडलेली सेवा, जनतेच्या विश्वासातून मिळालेली ताकद आणि न्यायासाठीचा ठाम लढा—हेच आमचे बळ आहे. नवीन वर्षात सत्य, समता आणि विकासासाठीची लढाई अधिक जोमाने सुरू राहील,” असा ठाम निर्धार व्यक्त केला. त्यांच्या या भूमिकेला प्रभागातील नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक एकवटून प्रचारात सक्रिय झाले असून प्रभाग क्रमांक 20 मध्ये यंदा चुरशीची लढत होण्याची चिन्हे दिसत आहेत. बदल, पारदर्शकता आणि सर्वसमावेशक विकासाच्या अपेक्षेने मतदार डॉ. सुलक्षणा शिलवंत यांच्या उमेदवारीकडे आशेने पाहत आहेत.

प्रभाग क्रमांक 20 मधील प्रत्येक नागरिकाचा विश्वास हेच माझे खरे भांडवल आहे. संघर्षातून शिकलेली सेवा, जनतेच्या पाठबळातून मिळालेली ताकद आणि न्यायासाठीचा ठाम लढा घेऊन मी काम करणार आहे. पारदर्शक, सर्वसमावेशक आणि विकासाभिमुख कारभार देण्याची जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पाडेन.

– डॉ. सुलक्षणा शिलवंत, उमेदवार, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष, प्रभाग- 20.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group