नवीन वर्षात तब्बल ४ ग्रहणे; ‘या’ दिवशी असेल वर्षातील पहिले सूर्यग्रहण

Grahan 2026 : खगोलशास्त्र आणि ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने २०२६ हे वर्ष अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. नवीन वर्षात एकूण ४ ग्रहणे लागणार असून यामध्ये २ सूर्यग्रहणे आणि २ चंद्रग्रहणांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, वर्षातील पहिलेच चंद्रग्रहण होळीच्या दिवशी येत असल्याने धार्मिक क्षेत्रात याची मोठी चर्चा सुरू झाली आहे.
१७ फेब्रुवारी २०२६ – हे वर्षातील पहिले सूर्यग्रहण असेल. हे ग्रहण आफ्रिका आणि दक्षिण अमेरिकेत दिसणार आहे. भारतात हे ग्रहण दिसणार नसल्यामुळे याचा सुतक काळ मान्य नसेल. (वेळ: दुपारी ३:२६ ते रात्री ७:५७)
१२ ऑगस्ट २०२६ – हे सूर्यग्रहण युरोप, कॅनडा आणि ग्रीनलँडमध्ये दिसेल. भारतात हे ग्रहण रात्री ९:०४ ते पहाटे ४:२५ दरम्यान असेल, त्यामुळे ते भारतात दिसणार नाही आणि सुतक काळही पाळण्याची गरज नाही.
हेही वाचा – रेल्वेने फिरायला निघण्याचा बेत? रेल्वे आसन आरक्षण तक्त्यासंदर्भात मोठा निर्णय
३ मार्च २०२६ – पहिले चंद्रग्रहण – होळी – हे २०२६ मधील पहिले चंद्रग्रहण असेल जे भारतात दिसणार आहे. फाल्गुन पौर्णिमेला म्हणजेच होळीच्या दिवशी हे खंडग्रास चंद्रग्रहण लागणार आहे.
भारतात हे ग्रहण दुपारी ३:२० ते संध्याकाळी ६:४७ पर्यंत असेल. यामुळे भारतात सुतक काळ मान्य असेल आणि होळीच्या पूजेवरही याचा परिणाम होऊ शकतो. सुतक काळ सकाळी ६:२० पासून सुरू होईल.
२८ ऑगस्ट २०२६ – दुसरे चंद्रग्रहण हे वर्षातील शेवटचे ग्रहण असेल, परंतु ते भारतात दिसणार नाही. त्यामुळे याचे वेध किंवा सुतक काळ भारतात पाळला जाणार नाही.





