Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

तरुण नेतृत्व तुषार सहाणे ठरतायेत जनसामान्यांची पसंती!

इंद्रायणीनगरमध्ये विकासाचा आश्वासक चेहरा म्हणून तुषार सहाणे यांना नागरिकांची ""प्रायोरिटी"

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले असून प्रभाग क्रमांक ८, इंद्रायणी नगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार तुषार सहाणे यांनी प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे. एका सामान्य कुटुंबातून येऊन उद्योग क्षेत्रात स्वतःचे स्थान निर्माण करणाऱ्या या यशात आपल्या अनेक सहकाऱ्यांना सोबत घेऊन चालणाऱ्या या तरुण नेतृत्वाला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने तुषार सहाणे यांनी प्रभागातील महिलांशी संवाद साधून त्यांच्या दैनंदिन समस्या जाणून घेतल्या. पाणीपुरवठा, सुरक्षा आणि आरोग्य या विषयांवर महिलांनी आपल्या तक्रारी मांडल्या. यावेळी बोलताना सहाणे म्हणाले की, “मी केवळ आश्वासने देण्यासाठी आलो नाही, तर तुमच्या समस्यांवर ठोस उपाययोजना करण्यासाठी कटिबद्ध आहे.” महिला वर्गानेही त्यांचे मनापासून स्वागत करत आपल्या हक्काचा नेता म्हणून त्यांना पाठिंबा दर्शवला. प्रचाराच्या पहिल्या टप्प्यातच सहाणे यांनी सर्व वयोगटातील नागरिकांशी थेट संपर्क प्रस्थापित केला आहे.

हेही वाचा –  पहलगाम हल्ला, दिल्ली स्फोटाचा अचूक तपास; अमित शहांकडून पोलिसांची प्रशंसा

लोकांचा ‘हवा-हवासा’ वाटणारा नेता

“सामान्य घरातील मुलगा जेव्हा निवडणुकीत उतरतो, तेव्हा त्याला जनतेच्या वेदनांची अधिक चांगली जाण असते,” अशी भावना प्रभागातील नागरिक व्यक्त करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून आपले आणि प्रभागाचे भवितव्य घडवण्यासाठी तुषार सहाणे करत असलेली धडपड सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

स्थानिक प्रश्नांवरील ठाम भूमिका आणि भविष्यातील स्पष्ट राजकीय संकल्पना यामुळे इंद्रायणी नगरमध्ये नागरिकांचा प्रचंड पाठिंबा मिळत आहे. पालिकेच्या माध्यमातून प्रभागाचा विकास सोबतच युवकांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबविण्याचा मानस आहे. महिला सक्षमीकरण करत महिलांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देणार आहे.

– तुषार सहाणे,माजी प्रमुख विश्वस्त जेजुरी देवस्थान

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button