पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादीने ‘विनिंग कॅन्डिडेट’ गमावला! राहुल कलाटेंचा आज भाजपात प्रवेश!
निवडणूक प्रमुख आमदार शंकर जगताप, आमदार महेश लांडगे यांना पक्षश्रेष्ठींचा धक्का

पिंपरी | पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार गट असा ‘पॉवर प्ले’ सुरू असतानाच आता अजितदादांनी आणखी एक ‘विनिंग कॅन्डिडेट’ गमावला आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते राहुल कलाटे अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करतील अशी शक्यता होती. प्रभाग 24, 25, 26 मध्ये कलाटे यांचा मोठा प्रभाव आहे. कलाटे यांनी भाजपात प्रवेश करण्याची तयारी केली असून, आज ‘मुहूर्त’ निश्चित झाल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
हेही वाचा : EVM मध्ये मोठा बदल; उमेदवारांच्या नावांचा क्रम बदलला, आता अशी दिसणार नावं
वास्तविक, भाजपाचे निवडणूक प्रमुख आमदार शंकर जगताप आणि आमदार महेश लांडगे यांनी कलाटे यांच्या प्रवेशाबाबत पक्षश्रेष्ठींकडे नकारात्मक भूमिका घेतली होती. या दोन्ही नेत्यांना डावलून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार कलाटे आता ‘कमळ’ हातात घेण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे शहर भाजपात खळबळ उडाली आहे.





