Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

“२०२९ ला राज्यात महायुती…”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य नेमकं काय?

मुंबई : महाराष्ट्रात नगर परिषद निवडणुकांचे निकाल रविवारी लागले.यामध्ये भाजपा आणि महायुतीचा दणदणीत विजय झाला आहे. महायुतीने २०० हून अधिक जागांवर विजय मिळवला आहे. दरम्यान या विजयानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येतील अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांची चर्चा झाल्याचंही कळतं आहे. तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा मंगळवारी होईल अशा चर्चा आहेत. याबाबत विचारलं असता देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.

राज्यातील नगर परिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचे निकाल नुकतेच जाहीर झाले. यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी आगामी महापालिकांच्या निवडणुकांवर लक्ष केंद्रित केले आहे. यादरम्यान पुणे महापालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्रित येणार असल्याचा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षातील नेते दत्ता धनकवडे यांनी केला आहे. त्यामुळे शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्ष आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत लवकरच समेट होम्याची शक्यता वर्तवली जात आहे. दोन्ही राष्ट्रवादी या एकत्रच येणार आहेत. त्या संदर्भात नेत्यांमध्ये चर्चाही झालेल्या आहेत. आता फक्त औपचारिक घोषणा होणे बाकी आहे. ती लवकरच होणार असून आपल्याला त्या माधमातून एक चांगली बातमी मिळेल. येत्या दोन ते तीन दिवसांत याबाबतची घोषणा झालीच पाहिजे, असे धनकवडे यांनी पुण्यातील माध्यमांना सांगितलं. यानंतर आता सुप्रिया सुळे आणि अजित पवार एकत्र येतील अशा चर्चा आहेत. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारलं असता त्यांनी प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा –  महानगरांची सत्ताशर्यत सुरू; उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया आजपासून; मुंबईतील समीकरणांबाबत उत्सुकता

“एक गोष्ट तुम्हाला सांगतो, ऐकीव गोष्टींवर मी प्रतिक्रिया देत नाही. आमचं एक तत्व पक्कं आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्या त्या परिस्थितीनुसार लढले जातात. आमची महायुती आहे. ही महायुती कायम राहणार आहे. तसंच पाच वर्षांनी जेव्हा आम्ही विधानसभेच्या किंवा लोकसभेच्या निवडणुकीला सामोरे जाऊ तेव्हाही आमची महायुती तुम्हाला पाहण्यास मिळेल. ” असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

शिवसेनेतलं सर्वात मोठं बंड करत एकनाथ शिंदेंनी आपल्या पक्षासह भाजपाशी हातमिळवणी केली. ज्यानंतर एकनाथ शिंदे हे जून २०२२ ते नोव्हेंबर २०२४ या कालावधीत भाजपाच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री झाले होते. तर जुलै २०२३ मध्ये अजित पवारही त्यांच्या ४२ आमदारांसह महायुतीत म्हणजेच सत्तेत सहभागी झाले. २०२४ ला रेकॉर्डब्रेक २३२ जागा मिळवत पुन्हा महायुतीच सत्तेवर आली आहे. दरम्यान नगर परिषद निवडणुकानंतर दोन राष्ट्रवादी एकत्र येणार अशा चर्चा रंगल्या असून त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button