Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

राज्यातील नगरपरिषदा, नगरपंचायतीवर ताबा कोणाचा? ; आजच्या निकालाने चित्र स्पष्ट होणार

Election Result 2025 :  राज्यातील सर्व 288 नगरपरिषदा , नगरपंचायतींच्या निवडणुकीची आज  मतमोजणी पार पडणार आहे. या मतमोजणींनंतर  राज्यातील नगरपरिषदा, नगरपंचायतीच्या चाव्या कोणाकडे जाणार ? हे चित्र स्पष्ट होणार आहे. दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं 21 डिसेंबर 2025 रोजी मोमोजणी करण्याच्या आदेशानुसार, आज राज्यभरातील 288 नगरपरिषदा, नगरपंचायतींची मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे.

राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या निकालाबाबत उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं महत्त्वाचा निकाल दिलेला. काही नगरपरिषदांबाबत न्यायालयीन प्रक्रिया प्रलंबित असल्यानं राज्यातील जवळपास 20 नगरपरिषदांची मतदान प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली होती.

हेही वाचा –  “दिशाभूल करणाऱ्यांचा समाचार घेतल्याशिवाय राहणार नाही “; नीलम गोऱ्हे कडाडल्या; कोणाला दिला इशारा?

ही निवडणूक 20 डिसेंबरला पार पडली. त्यामुळे सर्व निवडणुकांचे निकाल एकाच दिवशी जाहीर व्हावेत. अन्यथा 20 नगरपरिषदांच्या निकालावर प्रभाव पडू शकतो, अशी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली. उच्च न्यायालयाच्या खंडपीठानं सर्व नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचा निकाल एकाच दिवशी म्हणजे, 21 डिसेंबरला जाहीर करण्याचे निर्देश दिले होते.

2 डिसेंबरला पार पडलेलं मतदान

राज्यातील 264 नगरपरिषदा, नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 2 डिसेंबरला मतदान झालं होतं. तसेच, सुधारित निवडणूक कार्यक्रमानुसार, 24 नगरपरिषदा, नगरपंचायतींच्या अध्यक्षपदांसह सर्व सदस्यपदांसाठी आणि 76 नगरपरिषदा, नगरपंचायतींमधील 154 सदस्यपदांच्या जागांसाठी 20 डिसेंबर 2025 रोजी मतदान घेतलं जाणार आहे. या सर्व ठिकाणी 21 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजेपासून मतमोजणी सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा  

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button