Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडराजकारण

Big Breaking News। राजकीय दिवाळी: अजित पवारांनी वाजवल्या ‘टिकल्या’; तर महेश लांडगेंनी लावला ‘सुतळी बॉम्ब’

मिशन- PCMC : पिंपरी-चिंचवडमधील सर्व पक्षीय ‘हुकमी एक्के’ भारतीय जनता पार्टीत दाखल

पिंपरी-चिंचवड । विशेष प्रतिनिधी ।  पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने भाजपातील काही माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात बारामती गेस्टहाउसमध्ये प्रवेश करुन घेतला. याला जोरदार प्रत्युत्तर देत भारतीय जनता पार्टीचे आमदार महेश लांडगे आज सर्वपक्षीय 22 दिग्गजांचा भाजपात प्रवेश करण्यात आला.

महापालिका निवडणूक आचार संहिता सुरू झाली आहे. दि. 15 जानेवारी 2026 रोजी मतदान आणि दि. 16 जानेवारी रोजी निकाल घोषीत होईल. महापालिका निवडणुकीत भाजपा आणि राष्ट्रवादी अजित पवार गट स्वबळावर लढणार आहेत.

शहरात राजकीय दिवाळी सुरू झाली असून, अजित पवारांनी वाजवल्या ‘टिकल्या’; तर महेश लांडगेंनी लावला ‘सुतळी बॉम्ब’ असे चित्यार पहायला मिळत आहे.

विशेष म्हणजे, प्रवेशांसाठी कोणत्याही स्थानिक नेत्याला पक्षश्रेष्ठींकडे विशेष ‘फिल्डिंग’ लावावी लागली नाही. त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या काळात शहरातील निर्णय शहरात होतात, यावर शिक्कामोर्तब झाले आहे. आमदार महेश लांडगे यांनी भाजपा पिंपरी-चिंचवड शहराचे नेते म्हणून राष्ट्रवादीला अक्षरश: घायाळ केले आहे. त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचा मोठा ‘सपोर्ट’ असल्याचे सिद्ध झाले आहे.

भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलेल्या मान्यवरांची यादी पुढीलप्रमाणे :

१) माजी महापौर उभाठा गटाचे नेते – श्री संजोगजी वाघेरे पाटील
२) माजी अध्यक्ष, स्थायी समिती – सौ. उषाताई वाघेरे
३) राष्ट्रवादीचे माजी स्थायी समिती अध्यक्ष – श्री प्रशांत शितोळे
४) राष्ट्रवादीचे माजी विरोधी पक्षनेते – श्री विनोद नढे
५) राष्ट्रवादीचे माजी उपमहापौर – श्री प्रभाकर वाघेरे
६) माजी उपमहापौर – श्री राजू मिसाळ
७) उभाठा गटाचे नगरसेवक – श्री अमित गावडे
८) उभाठा गटाच्या नगरसेविका – सौ. मीनलताई यादव
९) श्री रवी लांडगे
१०) माजी नगरसेवक – श्री संजय नाना काटे
११) राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविका – सौ. आशाताई सूर्यवंशी
१२) श्री प्रविण भालेकर
१३) श्री जालिंदर बापु शिंदे
१४) श्री सचिन सानप (स्वतः व पत्नी)
१५) श्री दादा सुखदेव नरळे (स्वतः व पत्नी)
१६) श्री सदगुरु कदम
१७) श्री समीर मासुळकर (स्वतः व पत्नी)
१८) डॉ. श्री सुहास कांबळे
१९) श्री कुशाग्र कदम
२०) श्री अशोक मगर
२१) श्री नागेश गवळी
२२) श्री प्रसाद शेट्टी – माजी नगरसेवक.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button