भोसरी : श्री एस. पी. देशमुख शिक्षण संस्था, चाकण यांचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा २०२५–२६ भोसरी येथील अंकुशराव लांडगे सभागृहात अत्यंत उत्साहात व सांस्कृतिक भव्यतेत संपन्न झाला. या सोहळ्यात विद्याव्हिजन किडीज गार्डन व विद्यानिकेतन इंग्लिश मिडियम स्कूल यांनी अनुक्रमे “नन्हे कदम, उंची उड्डाण” आणि “युगांतक – Carrying Legacy into the New Era” या दोन प्रभावी संकल्पना सादर केल्या.
कार्यक्रमाची सुरुवात विद्याव्हिजन किडीज गार्डन, चाकण यांच्या प्राचार्या सौ. नीलम सिंग यांच्या स्वागतपर भाषणाने झाली. त्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन करण्यात आले.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून
मा. देवेंद्र बुट्टे पाटील (अध्यक्ष, खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळ, राजगुरुनगर),
मा. नानासाहेब टाकळकर (उपाध्यक्ष),
मा. एन. डी. पिंगळे (संस्थापक – नवसह्याद्री चॅरिटेबल ट्रस्ट)
तसेच मा. साहेबराव देशमुख (संस्थापक – श्री एस. पी. देशमुख शिक्षण संस्था, चाकण) उपस्थित होते.
संस्थेचे पदाधिकारी मा. शामराव देशमुख (अध्यक्ष), मा. सुमंताई देशमुख (खजिनदार), मा. डॉ. रोहिणीताई देशमुख (मुख्य कार्यकारी अधिकारी), मा. हर्षल देशमुख (संचालक) व मा. डी. पी. सोनवणे (समिती सदस्य) यांचीही सन्माननीय उपस्थिती लाभली.
तसेच शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल प्रदीपा नायर, शिभू राजू, मनिषा गुंजाळ, आभा परमार, अर्चना मंगलोर व विजया पाटील यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
हेही वाचा : पृथ्वीराज चव्हाण जगातील सर्वात मोठे भविष्यवेत्ते; चंद्रशेखर बावनकुळेंचा खोचक टोला
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्य, नाट्य व सांस्कृतिक सादरीकरणांनी उपस्थितांची मने जिंकली. चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या “नन्हे कदम, उंची उड्डाण” या सादरीकरणाने प्रेक्षक भारावून गेले, तर “युगांतक” या संकल्पनेतून भारतीय संस्कृतीतील चार युगांचे प्रभावी दर्शन घडवण्यात आले.
या प्रसंगी मा. डॉ. रोहिणीताई देशमुख यांना पीएच.डी. पदवीप्राप्तीबद्दल विशेष गौरव करण्यात आला. तसेच श्री पार्थ रवींद्र बोडके (नामांकित कोरिओग्राफर), श्री विराज पाटील व श्री वरुण राजेंद्र जाधव (युवा उद्योजक) यांचा विशेष पुरस्काराने सन्मान करण्यात आला. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा देखील सत्कार करण्यात आला.
प्रमुख पाहुणे मा. देवेंद्र बुट्टे पाटील यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांच्या शिस्तबद्ध सादरीकरणाचे व संस्थेच्या दूरदृष्टीपूर्ण कार्याचे विशेष कौतुक केले. त्यानंतर विद्यानिकेतन इंग्लिश मिडियम स्कूलचा वार्षिक अहवाल मा. दीपक शिंदे यांनी सादर केला.
या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष मा. शामराव देशमुख यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, “विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, मूल्याधिष्ठित शिक्षण आणि सांस्कृतिक जडणघडण हीच आमच्या संस्थेची खरी ओळख आहे. ‘युगांतक’ या संकल्पनेतून परंपरा आणि आधुनिकतेचा समतोल विद्यार्थ्यांनी अत्यंत प्रभावीपणे साकारला आहे.”
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, सांस्कृतिक विभाग, कोरिओग्राफर, संगीत व कला शिक्षक, तांत्रिक टीम, सूत्रसंचालक, विद्यार्थी व पालकवर्ग यांच्या सहकार्याबद्दल संस्थेच्या वतीने मनःपूर्वक आभार मानण्यात आले.
कार्यक्रमाचा समारोप विद्यानिकेतन इंग्लिश मिडियम स्कूल, चाकण यांच्या प्राचार्या मा. रैना मून यांच्या आभार प्रदर्शनाने झाला. या यशस्वी आयोजनामागे मा. दीपक शिंदे, सौ. नीलम सिंग, मा. रैना मून व मा. स्वाती रणदिवे यांच्या नेतृत्व व नियोजनाचे मोलाचे योगदान लाभले.





