‘दोन नंबरवाल्यांनी उद्धव ठाकरेंना शेवटच्या नंबरवर बसवले, त्यांचे बॅलन्स गेले आहे’; एकनाथ शिंदे

नागपूर: शिवसेना नेते आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर सडकून टीका केली. यानंतर आता भाजप आणि शिवसेना शिंदे गटाकडून उद्धव ठाकरेंच्या पत्र परिषदेवर विविध टीका केल्या जात आहेत. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांनी स्वतः कशी मुंबईची लूट केली आणि आम्ही त्यांना कसे शेवटच्या भागावर बसवले अशी प्रतिक्रिया दिली. एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले पाहूया.
उद्धव ठाकरे यांनी संघ आणि भाजप टीका केलेली आहे. वंदे मातरम गीतावर सुरू झालेली वादाची चर्चा हा देशाचा राष्ट्रगीताचा अपमान आहे. मुळात ही चर्चा संघाचे कपडे उतरवण्यासाठी झाली आहे का? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी केला. ते म्हणाले की, श्यामाप्रसाद मुखर्जी हे भाजपच्या नेत्यांसाठी गुरुस्थानी आहेत. अनेक लोक त्यांना आदर्श मानतात. मात्र वंदे मातरमच्या चर्चेदरम्यान यांनी श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या अनेक गोष्टींना उघडे पाडण्याचा प्रताप केलेला आहे. मुखर्जी यांनी या गीताला विरोध केला होता. ते स्वतः मुस्लिम लीग सोबत गेले होते.
हेही वाचा – ‘युवा वर्ग भारताचा भाग्यविधाता’; पद्मश्री गिरीश प्रभुणे
अनेक ठिकाणी त्यांनी मुस्लिम लीगसोबत युती केली होती. तसेच देशातील ‘ चले जाव’ आंदोलनाला त्यांचा विरोध होता असाही आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. त्यामुळे या चर्चेतून भाजपने श्यामाप्रसाद मुखर्जींचे पितळ उघडे पाडले असा आरोपही ठाकरे यांनी केला. त्यामुळे मुस्लिम लीग सोबत जाणाऱ्यांनी आणि स्वातंत्र्य युद्धात ज्यांचा कुठेही सहभाग नव्हता, अशा गृहमंत्री अमित शहा यांनी मला हिंदुत्व शिकवायची गरज नाही असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
एकनाथ शिंदे म्हणाले की, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी करोना काळात मळ्यांच्या टाळूवरचे लोणी खाण्याचे काम केले. अनेक वर्ष महापालिकेत सत्ता असताना मुंबईचे लूट केली. अशा लोकांना अमित शहावर आरोप करण्याचा कुठलाही अधिकार नाही. त्यांची पत्रकार परिषद पाहता त्यांचे नियंत्रण बिघडले असल्याचे दिसून येते. आम्हाला दोन नंबरवाले उपमुख्यमंत्री जर ते म्हणत असतील तर याच दोन नंबर वाल्यांनी त्यांना शेवटचा नंबरवर नेऊन बसवले अशीही टीका एकनाथ शिंदे यांनी केली. एका शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाला हे त्यांना आवडत नाही





