Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

गुटखा तस्करी विरोधात पिंपरी चिंचवड पोलिसांची मोठी कारवाई; ३६ लाख ४७ हजारांचा मुद्देमाल जप्त

पिंपरी | गुटखा तस्करी विरोधात पिंपरी चिंचवड पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. बालेवाडी येथील रस्त्यावर ११ लाख ४७ हजार ९०० रूपयांच्या गुटखा आणि ट्रक असा एकूण ३६ लाख ४७ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. तसेच याप्रकरणी नरेश गणेश चौधरी (वय २२ वर्षे, रा. वेलकम होम अप्लायंस, स्पाईन रोड, भोसरी) याला अटक केली आहे. ही उल्लेखनीय कामगिरी पिंपरी चिंचवड पोलिसांच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने केली आहे.

गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार दि.०२ डिसेंबर रोजी मालमत्ता गुन्हे विरोधी पथकातील अधिकारी व अंमलदार अवैध धंदयाबाबत माहीती काढत असताना पोलीस उपनिरीक्षक महेश खांडे व पोलीस हवालदार नितीन लोखंडे यांना पुणे मुबंई हायवेवर एक ट्रक अवैध गुटख्याची वाहतूक करणार असल्याची खात्रीशीर माहिती प्राप्त झाली. त्यानंतर संपूर्ण टीमने पुणे-मुंबई हायवेवर सर्व्हस रोड लगत ऑचिड हॉटेलजवळ बालेवाडी येथे ट्रक (क्र MH-12-RN-3203) पकडला. आरोपी नरेश चौधरी याला ट्रक मधील मालाबाबत विचारणा केली असता त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली. त्यानंतर पोलिसांनी ट्रक मधील मालाची पाहणी केली असता ११ लाख ४७ हजार ९०० कृपया किमतीचा अवैद्य गुटखा मिळुन आला.

हेही वाचा       :            राज्य सरकारचा मोठा निर्णय! डिजीटल ७/१२ ला कायदेशीर मान्यता 

त्यानुसार आरोपी नरेश चौधरी याच्याविरुद्ध बावधान पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामध्ये ११ लाख ४७ हजार ९०० रुपयांचा गुटखा आणि २५ लाखाचा टाटा कंपनीचा ट्रक असा एकुण ३६ लाख ४७ हजार ९०० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

सदर उल्लेखनीय कामगिरी ही मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, सहायक पोलीस निरीक्षक रावसाहेब मोटे, पोलीस उपनिरीक्षक महेश खांडे, पोलीस अंमलदार नितीन लोखंडे, गणेश कोकणे, विशाल गायकवाड, पवन वाजे, सुमित देवकर, समीर रासकर, अमर कदम व ज्ञानेश्वर कौलगे यांनी केली आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button