…अन्यथा मोठा निर्णय! शिंदेसेनेची छत्रपती संभाजीनगरमध्ये गुप्त बैठक; भाजपसमोर ठेवणार ‘हा’ प्रस्ताव

Chhatrapati Sambhajinagar : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मोठ्या रंगतदार होणार असल्याचे सध्याच्या राजकीय चित्र पाहल्यानंतर दिसते. नुकताच बिहार विधानसभेचा निकाल जाहीर झाला. या निकालात एनडीएने महागठबंधनची दाणादाण उडवून दणक्यात मोठा विजय मिळवला. या निवडणुकीत भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे तिथे सत्तास्थापनेसाठी लवकरच हालचालींना वेग येणार आहे.
अशातच आता महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या घडामोडी घडत आहेत. या निवडणुका महायुतीमधील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी महत्वाच्या असणार आहे. आता छत्रपती संभाजीनगरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे.
शिवसेनेचे नेते मंत्री संजय शिरसाट यांनी निवासस्थानी शिवसेना छत्रपती संभाजीनगर कोअर कमिटीची बैठक झाली. ही बैठक अत्यंत गोपनीय ठेवण्यात आली होती. या बैठकीत जिल्ह्यातील स्थानिक निवडणुकांच्या अनुषंगाने काही निर्णय झाल्याची माहित आहे. शिवसेना भाजपसमोर युतीचा प्रस्ताव ठेवणार आहे आणि हा युतीचा प्रस्ताव भाजपने जर मान्य केला नाही, तर शिवसेना स्वबळावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवणार असल्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
हेही वाचा – नियम मोडणाऱ्या 30 आरएमसी प्लांटवर होणार कारवाई
या बैठकीला शिवसेनेतील अनेक महत्वाचे नेते उपस्थित होते. यामध्ये मंत्री संजय शिरसाट, खासदार संदीपान भुमरे, आमदार प्रदीप जैस्वाल, आमदार रमेश बोरनारे, आमदार संजना जाधव, माजी आमदार किशनचंद तनवाणी, कैलास पाटील, अण्णासाहेब माने पाटील, भाऊसाहेब चिकटगावकर आदी नेते उपस्थित होते.
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या धर्तीवर पालघर जिल्ह्यातील डहाणू नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजप विरोधात शिंदे सेनेसह सर्व राजकीय पक्ष एकत्र आले आहेत. तर नंदुरबार नगरपालिकेसाठी शिवसेना एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या राष्ट्रावादीच्या युतीची शक्यता आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा कशा पद्धतीचे राजकीय चित्र पाहायला मिळणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.




