Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘मुंबई महापालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार’; रमेश चेन्निथला यांची घोषणा

मुंबई | राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. विशेषत: मुंबई महापालिका निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली असून, यामध्ये काँग्रेसने आज मोठी घोषणा केली आहे. काँग्रेस पक्ष मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढवणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

रमेश चेन्निथला काय म्हणाले?

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस स्वबळावर लढणार आहे. २२७ जागांवर काँग्रेस पक्ष निवडणूक लढणार आहे. आमच्या पक्षाची जिल्हा काँग्रेस कमिटी, ब्लॉक काँग्रेस कमिटी आणि संपूर्ण पदाधिकाऱ्यांची हिच इच्छा आहे की आम्ही स्वबळावर निवडणूक लढवली पाहिजे. त्यामुळे आम्ही महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढणार आहोत, असं रमेश चेन्निथला यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा    :        “मी कट्टर भाजपा…” बिहारच्या निवडणुकीवर निवेदिता सराफ यांचं मोठं वक्तव्य 

रमेश चेन्निथला यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला की महापालिकेची निवडणूक काँग्रेस पक्ष स्वबळावर लढण्याच्या निर्णयाचं कारण काय आहे? यावर रमेश चेन्निथला यांनी म्हटलं की, स्थानिक पातळीवरील निवडणुका आहेत, त्यामुळे आमचे कार्यकर्ते जे बोलत आहेत, त्यांची जी इच्छा आहे, तो निर्णय आम्ही घेतला आहे. काहीही अडचण येणार नाही, येणाऱ्या दिवसांत आम्हाला आमचा पक्ष आणखी मजबूत करायचा आहे, असं रमेश चेन्निथला यांनी म्हटलं.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button