Breaking-newsताज्या घडामोडीपाटी-पुस्तकपिंपरी / चिंचवड

सीएसएम ट्रॉफी नॅशनल लेदर बॉल स्पर्धेत गोपाल मुजमुळेची चमकदार कामगिरी!

शिक्षण विश्व: आकुर्डी डी.वाय.पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाचा अभिमानाचा क्षण

पिंपरी चिंचवड: डी.वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय आकुर्डी येथील गोपाल मुजमुळे याने आग्रा येथे ७, ८ आणि ९ नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या सीएसएम ट्रॉफी नॅशनल लेदर बॉल स्पर्धेत महाराष्ट्र वरिष्ठ संघाचे प्रतिनिधित्व करताना उत्कृष्ट कामगिरी केली आहे.

कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डेटा सायन्स विभागाच्या द्वितीय वर्षातील विद्यार्थी असलेल्या गोपाल यांनी संपूर्ण स्पर्धेत सातत्यपूर्ण आणि उत्कृष्ट फलंदाजी करत आपली छाप उमटवली. तीन सामन्यांमध्ये त्यांनी एकूण १६० धावा करून संघासाठी मोलाचे योगदान दिले. अंतिम सामन्यात त्यांनी केवळ ३३ चेंडूत ७३ धावांची दमदार खेळी करत संघाला विजेतेपदाच्या शर्यतीत नेले. त्यांच्या या शानदार कामगिरीमुळे महाराष्ट्र संघाने या स्पर्धेत उपविजेतेपद मिळवले.

हेही वाचा –  नवले पुलावर भीषण अपघात; दोन ट्रक आणि कारला लागली आग

गोपाल मुजमुळे यांच्या उल्लेखनीय प्रदर्शनाबद्दल त्यांना डीवाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाकडून उदयोन्मुख खेळाडू पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या या यशामुळे महाविद्यालय आणि महाराष्ट्र राज्याचा अभिमान वाढला आहे असे महाविद्यालय प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button