Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपाटी-पुस्तकपुणे

दहावी, बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर… कधी सुरू होणार परीक्षा?

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार बारावीची परीक्षा १० फेब्रुवारीपासून, तर दहावीची परीक्षा २० फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.

राज्य मंडळाचे सहसचिव प्रमोद गोफणे यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. राज्य मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत इयत्ता बारावी, दहावीची लेखी, प्रात्यक्षिक व इतर परीक्षा घेण्यात येतात. त्यानुसार बारावीची लेखी परीक्षा १० फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत घेतली जाणार आहे. तसेच प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी, अंतर्गत मूल्यमापन परीक्षा २३ जानेवारी ते ९ फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे.

हेही वाचा –  ‘सिंधुदुर्ग जिल्ह्यात एसटी बसेसची संख्या वाढवा’; मंत्री प्रताप सरनाईक

त्यात माहिती तंत्रज्ञान, सामान्य ज्ञान या विषयांच्या प्रात्यक्षिक परीक्षांचाही समावेश आहे. तर २० फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत दहावीची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी, अंतर्गत मूल्यमापन परीक्षा २ फेब्रुवारी ते १८ फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे. शरीरशास्त्र, आरोग्यशास्त्र, गृहशास्त्र या विषयांच्या प्रात्यक्षिक परीक्षांचाही त्यात समावेश आहे.

शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालये यांना अभ्यासक्रमाचे नियोजन करण्याच्या उद्देशाने, तसेच विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी होण्याच्या दृष्टीने फेब्रुवारी-मार्च २०२६ च्या परीक्षेच्या प्रात्यक्षिक, लेखी परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. परीक्षांचे विषयनिहाय सविस्तर अंतिम वेळापत्रक स्वतंत्रपणे मंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button