Breaking-newsताज्या घडामोडीपाटी-पुस्तकपिंपरी / चिंचवड

तालुका स्तरीय खो खो स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

शिक्षण विश्व: सिद्धांत इंटरनॅशनल स्कूल सुदुंबरे येथे पार पडली स्पर्धा

पिंपरी चिंचवड :सिद्धांत इंटरनॅशनल स्कूलच्या मैदानावर तालुकास्तरीय खो-खो स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. मावळ तालुक्यातील विविध शाळांनी या स्पर्धेमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवत खो खो खेळातील कौशल्याचे उत्तम प्रदर्शन केले.

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, जिल्हा परिषद पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे आणि सिद्धांत इंटरनॅशनल स्कूल सुदुंबरे यांच्या संयुक्त विद्यमाने मावळ तालुका स्तरीय शालेय खो खो स्पर्धेचे आयोजन ६ आणि ७ ऑक्टोबर २०२५ रोजी सिद्धांत इंटरनॅशनल स्कूलच्या मैदानावर करण्यात आले. मावळ तालुक्यातील विविध शाळांनी या स्पर्धेमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवत खो खो खेळातील कौशल्याचे उत्तम प्रदर्शन केले.

स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय संघाचे प्रशिक्षक आणि शिवछत्रपती राज्य क्रीडा मार्गदर्शक शिरेन गोडबोले उपस्थित होते. यावेळी राष्ट्रीय पंच आणि प्रशिक्षक देसाई, आंतरराष्ट्रीय खेळाडू निकिता चक्रधर पवार आणि कर्पे यांची उपस्थिती लाभली. याशिवाय सिद्धांत इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य कांबळे, सिद्धांत इंटरनॅशनल स्कूलचे डायरेक्टर राजेश जाधव, तसेच मुख्याध्यापिका सुप्रिया साळुंखे यांनीही कार्यक्रमास उपस्थिती लावली.

हेही वाचा –  ‘भारत आणि जर्मनीचा एकमेंकावर विश्वास, पीएम मोदींच्या नेतृत्वात संबंध अधिक मजबूत झाले’;मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

खो खो स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे: १४ वर्षे मुले
प्रथम क्रमांक – प्रगती विद्यामंदिर इंदोरी
द्वितीय क्रमांक – ग्रामप्रबोधनी विद्यालय साळुंबरे
तृतीय क्रमांक – कृष्णराव भेगडे इंग्लिश मिडियम स्कूल तळेगाव दाभाडे
उत्कृष्ट खेळाडू – गणेश दिवटे. १७ वर्षे मुले:
प्रथम क्रमांक – प्रगती विद्यामंदिर इंदोरी
द्वितीय क्रमांक – जैन इंग्लिश मिडियम स्कूल तळेगाव दाभाडे, तृतीय क्रमांक – VPS हाय स्कूल लोणावळा
उत्कृष्ट खेळाडू – आयुष भोसले. १९ वर्षे मुले:
प्रथम क्रमांक – इंद्रायणी विद्यामंदिर तळेगाव दाभाडे
द्वितीय क्रमांक – VPS हाय स्कूल लोणावळा
तृतीय क्रमांक – MIT ज्युनियर कॉलेज तळेगाव दाभाडे
उत्कृष्ट खेळाडू – सिद्धार्थ पवार

१४ वर्षे मुली: प्रथम क्रमांक – श्री संत ज्ञानेश्वर विद्यालय शाळा क्रमांक ६ तळेगाव दाभाडे
द्वितीय क्रमांक – तुळजाभवानी विद्यालय सोमटणे
तृतीय क्रमांक – स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल तळेगाव दाभाडे, उत्कृष्ट खेळाडू – तनुजा बुरुडे.

१७ वर्षे मुली: प्रथम क्रमांक – श्री संत ज्ञानेश्वर विद्यालय शाळा क्रमांक ६ तळेगाव दाभाडे
द्वितीय क्रमांक – रामभाऊ परुळेकर विद्यानिकेतन तळेगाव दाभाडे
तृतीय क्रमांक – जैन इंग्लिश स्कूल तळेगाव दाभाडे
उत्कृष्ट खेळाडू – सिद्धी केदारी. १९ वर्षे मुली
प्रथम क्रमांक – MIT ज्युनियर कॉलेज तळेगाव दाभाडे
द्वितीय क्रमांक – VPS हाय स्कूल लोणावळा
तृतीय क्रमांक – आदर्श विद्यामंदिर तळेगाव दाभाडे
उत्कृष्ट खेळाडू – गायत्री गायखे

स्पर्धेनंतर पार पडलेल्या बक्षीस वितरण समारंभात विजेत्या संघांना चषक देऊन गौरविण्यात आले. विशेष म्हणजे मुलींच्या गटातील उत्कृष्ट खेळाडूंना स्पोर्ट्स सायकल व चषक देऊन सन्मानित करण्यात आले. ही संपूर्ण स्पर्धा सिद्धांत इंटरनॅशनल स्कूलचे डायरेक्टर राजेश जाधव आणि मुख्याध्यापिका सुप्रिया साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. क्रीडा शिक्षक विशाल मोरे, रोहित भालेराव तसेच शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या प्रयत्नामुळे ही स्पर्धा यशस्वीरीत्या संपन्न झाली.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button